वार्ताहर /किणये
तालुक्यात दसरोत्सव-सीमोल्लंघन पारंपरिक पद्धतीने साजरे करण्यात आले. गावा-गावांमध्ये बुधवारी सीमेवर आपटय़ाची पाने वाटून, पालखी मिरवणूक काढून, देवदेवतांची पूजा-अर्चा करून सीमोल्लंघनाचा कार्यक्रम झाला.
तालुक्यात मंगळवारी दुपारनंतर खंडेनवमी पूजन करण्यात आले. ग्रामीण भागात वेगवेगळय़ा स्वरुपात नवरात्रोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे. बळीराजा शेत-शिवारात लागणाऱया साहित्याची पूजा करीत होते. काही गावांमध्ये बैल-म्हैस यांना सजवून गावच्या ग्रामदेवताच्या मंदिराभोवती पळविण्यात येते.
बुधवारी सकाळपासूनच अनेक गावातील मंदिरांजवळ पालखी मिरवणुकींना प्रारंभ झाला. हलगी, ढोलताशा व टाळ-मृदंगाच्या गजरात पालख्या मिरवणुका झाल्या. पालखीचे दर्शन घेण्यासाठी भक्तांनी गर्दी केली होती. आपटय़ाची पाने एकमेकांना वाटून ‘सोन घ्या सोन्यासारख रहा’ असे म्हणून शुभेच्छा देत होते.
सीमोल्लंघनानिमित्त मंदिरांना झेंडूसह विविध फुल-हारांनी सजविण्यात आले होते. मंगळवारी रात्री सर्वत्र खंडेनवमीची पूजा करून श्रीफळ वाढविण्यात आले.
शेतकऱयांसह ग्रामीण भागात कामकाज करणारा गवंडी कामगार, इलेक्ट्रिकल आदींनीही आपापल्या शस्त्रांची विधिवत खंडीला शस्त्रपूजवत पूजा केली. दोन दिवस शेतीसह इतर कामकाज करणाऱयांनीही आपापले कामकाज बंद ठेवले होते.
बेळगुंदी येथील रवळनाथ मंदिरात मंगळवारी दुपारी तीनच्या दरम्यान महाआरती करण्यात आली. पुजारी नामदेव गुरव व अरुण गुरव यांनी विधीवत रवळनाथाची पूजा केली. त्यानंतर गावभर मिरवणूक काढली. यावेळी गावातील नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. सायंकाळी सीमेवर सीमोल्लंघनाचा कार्यक्रम होऊन या सोहळय़ाची सांगता झाली.
नावगे येथील रामलिंग मंदिराच्या परिसरात पालखी मिरवणूक काढण्यात आली. प्रारंभी रामलिंग पिंडीची पूजा केली. त्यानंतर महाआरती झाली. सायंकाळी उशिरा सीमेवर धार्मिक विधी कार्यक्रम झाला.
बहाद्दरवाडी येथील ब्रह्मलिंग मंदिरात बुधवारी सकाळी पूजा करण्यात आली. दुपारी विठ्ठलाई देवी मंदिरात पूजा करून आरती केली. यावेळी आपटय़ाची पाने वाटत दसऱयाच्या शुभेच्छा देण्यात आला. मच्छे येथील ब्रह्मलिंग मंदिर येथून दुपारी दीड वाजता पुजारी व हक्कदार आणि देवस्थाप पंच कमिटीचे अध्यक्ष चांगाप्पा हावळ, उपाध्यक्ष सुरेश लाड, यांच्या हस्ते ब्रह्मलिंग मूर्ती व पालखीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर पारंपरिक वाद्यांच्या गजरात पालखी मिरवणूक गावातील मंदिरांना भेट देऊन बाळगमट्टी येथील भरमदेव मंदिरात गेली. त्याठिकाणी बुधवारी सायंकाळी सीमोल्लंघनाचा कार्यक्रम झाला.