पोलीस स्टेशन गणेश उत्सव नियोजन बैठक संपन्न
वेंगुर्ले / वार्ताहर:
गणेश चतुर्थी सण हा या भागातील सर्वात मोठा सण आहे. या सण कालावधीत कुठेही वाहने उभी करून वहातुकिची कोंडी होणार नाही यासाठी पत्येक भाविकांनी केलेले नियम पाळावेत. गणेशाचे आगमन, पुजन व विसर्जन कार्यक्रमावेळी घरातील मोजक्याच व्यक्ती, सार्वजनिक गणपती विसर्जनावेळी कमीत कमी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सोशल डिस्टंगसींगचा वापर करावा. रात्रौ 10 वाजण्याच्या पूर्वी वैयक्तीक वा सार्वजनिक गणपतीचे विसर्जन शांततेत सर्वानी करावे. प्रत्येक विसर्जन घाटांवर पोलीस आणि हामगार्ड तैनात करण्यांत आलेले आहेत. शांतता व सुव्यवस्थेत गणेश चतुर्थी सण साजरा करावा. असे आवाहन पोलीस निरीक्षक तानाजी मोरे यांनी गणेश चतुर्थी नियोजन बैठकित केले आहे.
वेंगुर्ले शहरांत नगरपरीषदेने बाजारपेठे भागात केलेल्या वहातुकिच्या नियोजनानुसार 10 ते 21 सप्टेंबर कालावधीत सारस्वत बँक ते गाडीअड्डा नाका पर्यत सर्व प्रकारच्या वाहनांना बंदी घालण्यात आलेली आहे. तसेच मोठी वाहाने हि शिरोनाका रामेश्वर मंदिरमार्गे कॅम्प-हॉस्पीटलनाका अशी ये-जा करतील. दाभोली नाका येथे बँरीकेट, पूर्वसमंदिर येथे बॅरीकेट तर हॉस्पीटलनाका येथे बॅरीकेट लावून बाजारपेठ भागात वाहानांना येण्यास बंदी घालण्यांत आलेली आहे. गाडय़ांचे पार्कींग रामेश्वर मंदिर नजीकच्या भागात, दाभोलीनाका येथील जिल्हा बँकेच्या ठिकाणी तर हॉस्पीटलनाका येथील मोकळ्या जागेत करण्यातं आली आहेत. तसेच शिरोडा बाजारपेठेत ग्रामपंचायतीने केलेल्या वहातुकिच्या नियोजनानुसार पोलीस बंदोबस्त लावण्यांत आलेला आहे.
या बैठकिस उपस्थितांत वेंगुर्ले तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष विवेक खनोलकर, टेम्पो चालक मालक संघटनेचे दत्तात्रय शेणई, रिक्षा संघटनेचे अध्यक्ष एकनाथ राऊळ, नरेंद्र शिरसाट, गोविंद वराडकर, गाडीअड्डा सार्वजनिक गणेशोत्सव मंडाळाचे अध्यक्ष गौतम मुळे, प्रसाद वराडकर, अभिजित पाटील, मिलींद केरकर, विकास शिनगोरे, प्रादेशिक फळ संशोधन केंद्राचे व्ही. एन. गेडाम आदी या बैठकिस उपस्थित होते.