वार्ताहर / किणये
तालुक्यात विविध ठिकाणी बलिदान मासाला रविवारपासून प्रारंभ करण्यात आला. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या फोटोप्रतिमेचे पूजन, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय’ अशा घोषणांनी तालुका दुमदुमून गेला होता.
धर्मवीर संभाजी महाराजांच्या बलिदानाचे स्मरण या बलिदान मासाद्वारे करण्यात येते. बहुतांशी गावातील तरुण 40 दिवस हे बलिदान मासाचे व्रत करतात.
पायात चप्पल न घालता अनवाणी राहून काही तरुण हे व्रत करताना दिसतात. तरुणांनी सामूहिक मुंडन करून बलिदान मास पाळण्यास सुरुवात केली आहे. धर्मवीर संभाजी महाराजांनी स्वराज्याच्या रक्षणासाठी केलेला त्याग, त्यांचे बलिदान, त्यांची शौर्यगाथा या बलिदान मासानिमित्त तरुणांमध्ये पोहोचविली जाते. अनेक गावांमध्ये धर्मवीर संभाजी महाराज यांच्या जीवनचरित्रावर आधारित व्याख्यानांचे आयोजनही करण्यात आले आहे.
खादरवाडी गावातील काही तरुण बलिदान मासाचे पालन करतात. रविवारी गावातील सुमारे 50 ते 60 तरुणांनी सामूहिक मुंडन करून घेतले. रात्री 8 वाजता ब्रम्हलिंग मंदिरात धर्मवीर संभाजी महाराजांच्या फोटोप्रतिमेचे पूजन करून या मासाला प्रारंभ करण्यात आला. रोज रात्री 8 वाजता येणारे चाळीस दिवस कार्यकर्ते एकत्र येऊन महाआरती करणार आहेत. रविवारी बाळू गुरव, प्रशांत पिंगट, बाळू बांडगी, अजय डोळेकर, श्रेयस पाटील, ज्ञानेश्वर सप्ले, प्रवीण गोरल, राम पिंगट, सुरेश पाटील, नागराज पिंगट आदी उपस्थित होते.
पिरनवाडी गावातही बलिदान मासाचे आचरण करण्यात येत आहे. रविवारी गावातील अनेक तरुणांनी मुंडन करून घेतले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे व धर्मवीर संभाजी महाराजांच्या फोटो प्रतिमेचे पूजन केले.
नारायण मुचंडीकर, यल्लाप्पा शिंदे, नागराज पेडणेकर, नागेश जाधव, अभिजीत पेडणेकर, बसवंत कदम, संदीप उदगडगी, निलेश ताशिलदार, मंथन मुचंडीकर, चांगदेव मुचंडीकर आदींसह इतर कार्यकर्त्यांचा सहभाग आहे.
बलभीम युवक संघ
कुदेमनी : येथील श्री बलभीम युवक संघ व ग्रामस्थांतर्फे छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास कार्यक्रम नुकताच बलभीम संघाच्या कार्यालयात झाला. मान्यवरांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या फोटोप्रतिमेचे पूजन करून बलिदान मासाला सुरुवात करण्यात आली.
जी. जी. पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले. ग्रा. पं. चे माजी सदस्य नागेश राजगोळकर, शिक्षक एम. बी. गुरव, गावडू आ. गुरव, कृष्णा धामणेकर, जोतिबा पाटील यांनी दीपप्रज्वलन केले.
ग्रा. पं. माजी सदस्य व सामाजिक कार्यकर्ते ईश्वर क. गुरव, गावडू ता. पाटील, काशिनाथ गुरव यांनी आरती ओवाळून व छत्रपती संभाजी महाराजांच्या फोटो प्रतिमेस पुष्पहार घालून पूजन केले.
यावेळी राम गुरव, जी. जी. पाटील, नागेश राजगोळकर यांनी छत्रपती संभाजी महाराजांनी धर्मरक्षणासाठी बलिदान देऊन त्याग केला. त्यांचे स्मरण व्हावे, त्यांच्या कारकीर्दीची माहिती यावेळी दिली. संभाजी महाराजांच्या स्मृतीस सर्व उपस्थितांनी अभिवादन करून जयजयकार केला.
यावेळी मारुती पाटील, सुहास गुरव, दीपक मराठे, सखाराम पाटील, प्रकाश कांबळे, ईश्वर गुरव, आकाश जांबोटकर, विशाल गुरव, सूरज धामणेकर आदींसह संघाचे कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते. बाळाराम धामणेकर यांनी आभार मानले.
संभाजी महाराजनगर नामफलकाचे कंग्राळी बुद्रुक येथे अनावरण
कंग्राळी बुद्रुक : कंग्राळी बुद्रुक येथील तलावानजीक युवावर्ग व ग्रामस्थांतर्फे रविवार दि. 14 रोजी छत्रपती संभाजी महाराज बलिदान मासाला प्रारंभ केला. याचे औचित्य साधून छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजनगर नामफलकाचे अनावरण केले.
यावेळी ग्रा. पं. उपाध्यक्ष अनिल पावशे, ग्रा. पं. सदस्य जयराम पाटील, यल्लोजी पाटील, तानाजी पाटील, उमेश पाटील, बाबू दोडमनी, ज्येष्ठ नागरिक भरमा भैरटकर आदींच्या हस्ते नामफलकाचे पूजन करून अनावरण करण्यात आले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा देऊन परिसर शिवमय करून सोडला.
यावेळी ग्रा. पं. सदस्य यल्लोजी पाटील, इंजिनियर राजकुमार पाटील, सदानंद चव्हाण आदींनी आपापले विचार मांडले. सदर परिसरामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा बसवून गावच्या सौंदर्यामध्ये भर घालूण्याचे मनोगत व्यक्त
केले.
यावेळी शाळा सुधारणा कमिटीचे माजी अध्यक्ष मल्लाप्पा पाटील, मयुर बसरीकट्टी, शाळा सुधारणा सदस्य शंकर कोनेरी, ग्रा. पं. माजी सदस्य व्यंकट पाटील, निरंजन जाधव, शंकर पाटील, यल्लाप्पा पाटील, मारुती अष्टेकर, शिवा कोळीसह गावातील सर्व युवक मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. प्रास्ताविक, सूत्रसंचालन व आभार राजू मन्नोळकर यांनी केले.