भगवे ध्वज-पताकांमुळे सर्वत्र भगवेमय वातावरण
वार्ताहर/ किणये
तालुक्यात शिवजयंती मोठय़ा उत्साहात व जल्लोषात साजरी करण्यात आली. गावागावांमध्ये असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला अभिषेक व पूजाअर्चा करण्यात आली. शिवजयंतीनिमित्त काही गावांमध्ये भगवे ध्वज व भगव्या पताका लावण्यात आल्या होत्या. यामुळे भगवेमय वातावरण पसरले होते. ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘जय भवानी जय शिवाजी’ अशा घोषणांच्या गजरामुळे अवघा तालुका शनिवारी दणाणून गेला होता.
शनिवारी तारखेनुसार शिवजयंती असल्यामुळे तालुक्याच्या बहुतांशी गावातील कार्यकर्ते शुक्रवारपासून शिवजयंती सोहळय़ाची तयारी करतानाचे चित्र दिसून आले. गेली दोन वर्षे कोरोना महामारीच्या संकटामुळे शिवजयंती सोहळा अगदी साधेपणाने साजरा करण्यात आला होता. सध्या कोरोनाचे सावट कमी झाले असल्यामुळे शिवभक्तांनी धुमधडाक्मयात शिवजयंतीचा सोहळा साजरा केला.
तालुक्मयातील बहुतांशी गावांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे उभारण्यात आले आहेत. शिवरायांचा पुतळा असलेल्या गल्लीत, चौकात, गावागावांमध्ये आकर्षक रंगरंगोटी, फुलांची सजावट, विद्युत रोषणाई करण्यात आली होती. शनिवारी पहाटेपासूनच छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष सुरू झाला. शिवरायांच्या मूर्तीला अभिषेक व महाआरती करण्यात आली.
अनेक गावांमध्ये शिवजयंतीनिमित्त पोवाडय़ांचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. काही ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर आधारित व्याख्याने, भाषण स्पर्धा झाल्या. यामुळे साऱयांनाच एक नवी स्फूर्ती, ऊर्जा मिळाली असल्याचे काहींनी बोलून दाखविले. स्पर्धांमध्ये शालेय विद्यार्थ्यांनी अधिक संख्येने भाग घेतला होता.
सावगाव येथे शिवस्मारक सेवा समिती, शिवप्रति÷ान हिंदुस्थान व ग्रामस्थ यांच्यावतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. प्रारंभी गावातील महालक्ष्मी मंदिरात देवीची विधिवत पूजाअर्चा करण्यात आली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती सोहळा साजरा केला. शिवरायांच्या मूर्तीचे पूजन सावगाव येथील प्रशांत काकतकर, दर्शन जोई (सांबरा), सेजल चौगुले, हरीश गवळी (बेळगाव) आदींच्या हस्ते करण्यात आले. या गावात शिवरायांची नित्यपूजा करण्यात येते.
पिरनवाडी नगरपंचायतीमध्येही शनिवारी शिवजयंती साजरी करण्यात आली. शिवरायांच्या फोटो प्रतिमेचे पूजन नोडल अधिकारी राजेश्वर चौगुला यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सचिन गोरले, अनिल भोईटे, प्रमोद मुचंडीकर, पिराजी सुळगेकर, सचिन राऊत, बसू कदम, किरण नेसरकर, नारायण मुचंडीकर, किरण खामकर, आदींसह नगरपंचायतीचे कर्मचारी व गावातील तरुण उपस्थित होते.
लक्ष्मी गल्ली, मच्छे येथेही शिवजयंती साजरी करण्यात आली. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर जन्मोत्सव सोहळा साजरा केला. यावेळी महादेव मंगणाकर, सचिन बेळगावकर, गणपत जाधव, मनोज साळुंखे, अभिजीत मोहिते, सागर चौगुले, सुनील देसूरकर, रोहन अनगोळकर आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.