अनेक ठिकाणी आढळली पडलेली मोठी झाडे व संरक्षण भिंतीचे तुकडे
प्रतिनिधी / पणजी
sताळगांव पंचायततर्फे सध्या ताळगांव नाल्याच्या साफसफाईचे काम हाती घेण्यात आले आहे. परंतु यादरम्यान कामगारांना अनेक अपरीहार्य समस्यांना सामोरे जावे लागत आहे. दरवर्षी पावसाळी पूर्व या नाल्याची साफसफाई करण्यात येते पण नंतर या नाल्याची पाहणी होत नाही, त्यामुळे येथे अनेक ठिकाणी मोठी झाडे, संरक्षण भिंत मोडून पडल्याने आता हा नाला साफ करताना कामगारांना त्रास होत आहे.
हल्ली जेसीबीच्या सहाय्याने नाल्यातील गाळ उपासण्याचे काम सुरु आहे. दरम्यान नाल्यातील शेवाळ आणि इतर कचरा काढण्यात येत आहे. परंतु या नाल्यात पडल्येल्या मोठी झाडे व संरक्षण भिंतीचे तुकडे कामात अडथळा आणत आहे.
या पार्श्वभुमीवर ताळगांव पंचायततर्फे महानगरपालिकेच्या सहाय्याने आधुनिक मशिनाच्या मदतीने सध्या ही पडलेली मोठी झाडे व संरक्षण भितींचे तुकडे काढण्याचे काम सुरु केले आहे. त्यामुळे नाल्यातील गाळ सहजरित्या उसापण्यास मदत होईल.