पोलिसांचा कडक बंदोबस्त
प्रतिनिधी / पणजी
ताळगांव येथे लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन केल्याचे दिसून येत आहे. राज्य सरकारने शुक्रवार, शनिवार, व रविवार असे तीन दिवस लॉकडाऊनचे आदेश जारी करण्यात आले होते. याच आदेशाचे पालन करत ताळगांव येथे फक्त जिवनावश्यक वस्तुची विक्री सुरु होती.
ताळगांव येथील फार्मासी, धान्यांची दुकाने, सुपरमार्केट, स्वस्त धान्यांची दुकाने, बँक, व काही प्रमाणात भाजीपाल्याची दुकाना व्यतिरीक्त येथे सर्वकाही बंद होते. जी महत्वाची दुकाने खुली होती तिथे देखील स्थानिक फिरकले नाही असे चित्र होते. रस्त्यावर देखील शुकशुकाहट पाहायला मिळाला.
पोलिसांचा कडक बंदोबस्त ताळगांव येथील सिमांवर पोलिसांचा कडक बंदोबस्त होता. आमराल बांध या ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती. दरम्यान सांताक्रूझमधून ताळगांव येथे येणारी तसेच ताळगांव येथून सांताक्रूझ दिशेने जाणाऱया प्रत्येक गाडीची तपासणी करुनच त्यांना सोडण्यात येत होते. तसेच प्रत्येक ठिकाणी पोलिसांची गाडी फिरत होती. भर पावसात देखील पोलिस गाडय़ांची तपासणी करत होते.