प्रतिनिधी /पणजी
ताळगाव कामराभाट येथील जुन्या साकावचा अर्धाभाग अचानक कोसळला. त्याचवेळी वरून खडी घेऊन जाणारा ट्रक वाकडा होऊन कठडय़ावर आदळला. या अपघातात कठडा कोसळला व ट्रकातील खडी खाली पडली तसेच ट्रकाचे मोठे नुकसान झाले.
सकाळच्यावेळी वर्दळ चालू असताना ही घटना घडली. खडूचा ट्रक जाण्यापूर्वी सिमेंट पिशव्यांचा एक ट्रक तेथून गेला होता. त्यानंतर हा खडीचा ट्रक जात असतानाच साकवाचा अर्धा भाग अचानक खचल्यामुळे ट्रक वाकडा होउढन कठडय़ावर आदळला.
रस्त्यावर पडलेली खडी व ट्रक तातडीने बाजूला करावा व साकवाची दुरूस्ती करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे. त्या साकवावरून वाहने हाकणे आता धोकादायक बनले आहे. सध्या केवळ दुचाकी वाहने तेथून जावू शकतात. परंतु चारचाकी वाहने जाऊ शकत नाहीत. या प्रकरणी सरकारने त्वरित उपाययोजना करावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.