प्रतिनिधी / तासगाव
तासगाव तालुक्यात कोरोना रुग्णसंख्या आजअखेर हजाराच्या पार गेली आहे. आज बुधवारी तासगाव शहरात एकाच दिवशी सर्वाधिक 23 रूग्ण सापडले आहेत. तर चिखलगोठण- 5, चिंचणी- 4, कवठेएकंद- 3, मणेराजुरी- 4, नागाव नि.- 2, सावळज- 7, वंजारवाडी- 3, येळावी- 3, तसेच बोरगाव, गोटेवाडी, मांजर्डे, नागेवाडी, नेहरूनगर, पाडळी, सावर्डे, शिरगाव, तुरची, विसापूर, वासुंबे येथे प्रत्येकी एक असे एकूण 65 कोरोनाबाधित रुग्ण बुधवारी सापडले आहेत. तालुक्यात वरील 20 गावातील 200 जणांची तपासणी आज करण्यात आली तर तालुक्यात आतापर्यंत 121 दिवसात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1028 अशी झाली आहे.