तासगाव/ प्रतिनिधी
तासगाव तालुक्यात शनिवारी चार गावातील पाच जणांना कोरोना ची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे.तर शहरात सलग आठव्या दिवशी ही शुन्य रूग्ण असे दिलासादायक चित्र पाहवयास मिळाले आहे.
तालुक्यात आत्तापर्यंत 216 दिवसात कोरोना बाधित रूग्णांची संख्या 3287 झाली आहे. तर शनिवारी तालुक्यातील कवठेएकंद येथे दोन व मणेराजुरी, बिरणवाडी, तुरची, येथे प्रत्येकी एक असे एकूण पाच रूग्ण सापडले आहेत.
तालुक्यात सलग चौथ्या दिवशी ही एकाही रूग्णांचा मृत्यू झालेला नाही. तर शहरात सलग आठ दिवसात एक ही रूग्ण नाही असे दिलासा दायक चित्र पाहवयास मिळाले आहे.