प्रतिनिधी/ बेळगाव
एखादी अधिकारी चक्क शाळा शिकवतो तेंव्हा हे आश्चर्यच म्हणावे लागेल. मात्र बेळगाव तालुका पंचायतचे कार्यकारी अधिकारी मल्लिकार्जुन कलादगी यांनी हे केले आहे. शुक्रवारी होनगा येथील मराठी हायस्कूलमध्ये अचानक भेट देवून तेथील दहावीच्या विद्यार्थ्यांना रात्री मार्गदर्शन करत अभ्यास कसा करावा आणि नेटक्मया वेळीत तो किती करावा यावर चर्चा केली. यामुळे विद्यार्थ्यांनी त्यांना चक्क सर तुम्ही आम्हाला दरोज शिकवण्यासाठी येता का? असा सवाल केला. त्यामुळे शिक्षकही आश्चर्यचकीत झाले.
लवकरच दहावी आणि बारावीच्या परीक्षा जवळ आल्या आहेत. अनेक विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी त्यांच्या घरामध्ये सोयी नसतात. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असते. हे नुकसान होवू नये यासाठी आता जिल्हा पंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी के. व्ही. राजेंद्र यांनी विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी ग्राम पंचायतीच्या खोल्या खुल्या करा, असा आदेश दिला होता. याची दक्षता घेवून मल्लिकार्जुन कलादगी यांनी आता तालुक्मयातील विविध शाळांना भेटी देण्यास सुरुवात केली आहे. विशेष करुन सरकारी शाळांमधील अभ्यासक्रमाचा विचार करत त्यांवर अधिक भर दिल्याचे दिसून येत आहे.
दहावीची परीक्षा अवघ्या 55 दिवसांवर येवून ठेपली आहे. त्यामुळे कमी वेळेत अधिक अभ्यास कसा करावा आणि तो लक्षात राहिल, या पध्दतीचे मार्गदर्शन कलादगी यांनी केले. शाळेमध्ये जास्तीतजास्त वेळे अभ्यासासाठी कसा देता येतो. दंगामस्ती न करता दहावीच्या टप्प्यावरच पुढील आयुष कसे अवलंबून असते, याचे मार्गदर्शन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
सध्या महापूरामुळे अनेकांची घरे कोसळली आहेत. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पर्यायी मार्गाचा विचार करावा लागत आहे. महत्वाचे म्हणजे महापूरामुळे अनेकांच्या घरातील विद्युत गायब झाली असून त्याचा परिणाम शिक्षणावर होताना दिसत आहे. त्यामुळे ग्राम पंचायतींच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी त्यांची सोय करण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. याची दक्षता घेत कलादगी यांनी तालुका दौरा सुरु केला आहे. होनगा येथे विद्यार्थ्यांना त्यांनी शिक्षणाबरोबरच मार्गदर्शन केल्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षकही भारावून गेले होते. यापुढे अजूनही तालुक्मयातील शाळांना भेटी देवून विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी सोय करुन देवू, असे त्यांनी तरुण भारतशी बोलताना सांगितले