वाहनासाठी तत्कालीन कार्यकारी अधिकारी कलादगी यांचे प्रयत्न
प्रतिनिधी /बेळगाव
तालुका पंचायतचा कारभार सुसूत्र करण्यासाठी अनेक अधिकाऱयांनी प्रयत्न केले. तालुक्मयातील कारभार सुलभ व विकासात्मक व्हावा, या दृष्टीने अधिकाऱयांचे प्रयत्न असले तरी कोणत्याही समस्या उद्भवल्यास त्यांना भाडोत्री वाहनाचा आधार घेऊन बाहेर पडावे लागत होते. त्यामुळे केवळ वाहनासाठी महिन्याकाठी सुमारे 40 हजार रुपये खर्च करावे लागत होते. आता सरकारने तालुका पंचायत कार्यकारी अधिकाऱयांसाठी नवीन सरकारी वाहन दिल्याने समस्या मिटली आहे.
तालुका पंचायतचे तत्कालीन कार्यकारी अधिकारी मल्लिकार्जुन कलादगी यांनी यासाठी प्रयत्न केले होते. मागील महिनाभरापासून हे वाहन शोरुममध्येच पडून होते. कारण कलादगी यांची बदली झाल्यानंतर तालुका पंचायतीचा कारभार प्रांताधिकारी रविंद्र करलिंगण्णावर यांच्याकडे देण्यात आला होता. त्यांच्याकडे प्रांताधिकारी कार्यालयाचा पदभार असल्याने त्यांनी तालुका पंचायतकडे दुर्लक्ष केले होते. आता या ठिकाणी कार्यकारी अधिकारी म्हणून राजेश दनवाडकर यांनी पदभार स्वीकारला आहे. त्यामुळे सरकारी वाहन रुजू करण्यात आले.
तालुका पंचायतचे कार्यकारी अधिकारी यांना वारंवार समस्या सोडविण्यासाठी तालुक्मयातील अनेक गावांना भेटी द्याव्या लागतात. मात्र यापूर्वी सर्व दौरे हे भाडोत्री वाहनावर सुरू होते. आता सरकारने तालुका पंचायत कार्यकारी अधिकाऱयांना वाहन दिल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे. यापूर्वीही अनेकवेळा मागणी करण्यात आली होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे दिसून आले होते.
वाहन दिल्याने समाधानी…
आपल्या कार्यकाळात सरकारने वाहन दिल्याने मी समाधानी आहे. आता विकासात्मक प्रयत्न करण्यासाठी प्रयत्न करणार असून तालुक्मयातील कोणत्याही ठिकाणी अडचण असेल तेथे जाऊन आपण ती समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. नवीन वाहन दिल्याने सरकारचे मी आभार मानतो.
राजेश दनवाडकर (ता.पं.कार्यकारी अधिकारी)