रेल्वे प्रवाशांचा सवाल ः दररोज घडताहेत वादावादीचे प्रसंग
प्रतिनिधी/ बेळगाव
मागील दोन वर्षांपासून बंद असलेले तिकीट काऊंटर सुरू करण्यात आले खरे परंतु रेल्वेमध्ये बसण्याचीच व्यवस्था नसल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. जनरल डब्यासाठी ऑनलाईन बुकिंग केलेल्यांकडून काऊंटरवर तिकीट काढून बसलेल्या प्रवाशांना उठविले जात असल्याने तिकीट काढूनही बसण्याची व्यवस्था नसल्याने प्रवाशांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे यावर तोडगा काढण्याची मागणी रेल्वे प्रवासी करीत आहेत.
कोरोनामुळे रेल्वे स्थानकांवरील तिकीट काऊंटर बंद करण्यात आले होते. आगाऊ बुकिंग करणाऱयांनाच रेल्वेत प्रवेश दिला जात होता. कोरोनाचा धोका कमी झाल्यानंतर बेळगाव रेल्वे स्थानकावरील तिकीट काऊंटरवर काही मोजक्मया एक्स्प्रेससाठी तिकीट दिले जात होते. मे महिन्याच्या दुसऱया आठवडय़ापासून सर्व एस्प्रेससाठी तिकीट काऊंटरवर तिकिटे देण्यास सुरूवात करण्यात आली.
तिकीट काऊंटरवर जनरल डब्यासाठी तिकिटे देण्यात आली खरी परंतु बसण्याची व्यवस्था नसल्याने गेंधळ होत आहे. एकीकडे तिकीट काऊंटरवर तिकिटे दिली जात असताना दुसरीकडे ऑनलाईन बुकिंगही सुरू आहे. जनरल डब्यासाठी ऑनलाईन बुकिंगही घेतले जात असल्याने वादावादीचे प्रकार घडत आहेत. बऱयाचवेळा ही वादावादी मारामारीपर्यंत पोहोचत आहे. आम्ही ऑनलाईन आधीच बुकींग केले असून सीटवरून उठणार नाही अशी भूमिका काही प्रवासी घेत आहेत. तर काऊंटरवर तिकीट काढलेले प्रवासी सीटवर बसण्यासाठी धडपड करीत आहेत. यातून योग्य तो तोडगा काढावा, अशी मागणी केली जात आहे.
सर्वच एक्स्प्रेससाठी काऊंटर सुरू
यापूर्वी बेळगाव-बेंगळूर व मिरज-बेंगळूर चन्नम्मा एक्स्प्रेस या दोनच एक्स्प्रेससाठी काऊंटरवर तिकिटे दिली जात होती. मागील आठवडय़ापासून बेळगावमधून धावणाऱया सर्वच एक्स्प्रेससाठी काऊंटरवर तिकिटे दिली जात आहेत. गोवा-निजामुद्दीन, यशवंतपूर-निजामुद्दीन, यशवंतपूर-गांधीधाम, म्हैसूर-अजमेर, यशवंतपूर-जोधपूर, यशवंतपूर-अजमेर, गांधीधाम-बेंगळूर, म्हैसूर-दादर यासह सर्वच एक्स्पेसला काऊंटरवर तिकीट दिले जात असल्याने प्रवाशांची सोय झाली आहे.