एखादी व्यक्ती घामाघूम होऊन छातीत तीव्र वेदना घेऊन हॉस्पिटलमध्ये दाखल होते. ईसीजी आणि इकोकार्डियोग्राम काढल्यानंतर हृदयामध्ये दोष आढळतो. त्या व्यक्तीचे त्वरित कोरोनरी अँजिओग्राम केले. ज्यामध्ये हृदयाच्या मुख्य रक्तवाहिनींमध्ये 100 टक्के ब्लॉकेज दिसून आले. त्याच्या हृदयात रक्तप्रवाह पूर्ववत करण्यासाठी आपत्कालीन अँजिओप्लास्टी करण्यात आली. त्याला कोणतीही पूर्वलक्षणे नव्हती.
अशी उदाहरणे आपण नेहमी पाहतो. हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी छातीत दुखणे, पाठदुखी, हात दुखणे, श्वास घेण्यास अडचण या विकारांकडे दुर्लक्ष करू नका. तुमच्या हृदयतज्ञांचा सल्ला घ्या. टेडमिल चाचणी ब्लॉकेज होण्याचा धोका जाणून घेण्यासाठी उपयुक्त ठरते.
हृदयविकाराचा झटका, रक्तपुरवठा करणाऱया रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण झाल्यामुळे होतो. मधुमेह, उच्चरक्तदाब, उच्च कोलेस्ट्रॉल, धूम्रपान, लठ्ठपणा, ताणतणाव ही याची कारणे आहेत.
ब्लॉकेजची तीव्रता 70 टक्क्मयांपेक्षा अधिक झाली तर हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो. टीएमटी करून आपण झटका येण्याआधी ब्लॉकेज येण्याचा धोका कमी करू शकतो.
टीएमटी टेस्ट नकारात्मक आल्यास मधुमेह, कोलेस्ट्रॉल, उच्चरक्तदाब नियंत्रण व वार्षिक हृदय तपासणी पुरेशी आहे. ही टेस्ट पॉझिटिव्ह आल्यास ब्लॉकेजची तीव्रता जाणून घेण्यासाठी कोरोनरी अँजिओग्राम केला जातो. मोठय़ा रक्तवाहिनीमध्ये 70 टक्क्मयांपेक्षा जास्त ब्लॉकेज असेल तर अँजिओप्लास्टी किंवा सीएबीजी आवश्यक
आहे. एकूणच हृदयविकाराचा धोका जितक्मया लवकर ओळखता येईल तितके उपचार सुलभ होतील.
– डॉ. दीपककुमार पुजार, वेणुग्राम हॉस्पिटल, बेळगाव. एमडीडीएम, डीएनबी (कार्डिओलॉजी), इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजीमध्ये फेलोशिप (बर्न युनिव्हर्सिटी हॉस्पिटल, स्वित्झर्लंड)
निरोगी हृदयासाठी योग्य आहार-विहार गरजेचा
बेळगावमध्ये गोवावेसजवळील लेकव्हय़ू हॉस्पिटल हृदयविकारावर प्रभावी शस्त्रक्रिया व इलाज यासाठी अग्रगण्य हॉस्पिटल आहे. छातीत वेदना होत असलेल्या रुग्णाला जर 15 मिनिटांमध्ये कॅथलॅबमध्ये आणले गेल्यास 30 मिनिटांपेक्षा कमी वेळेत हृदयातील ब्लॉकेजीस दूर केले जातात.
येथे 95 टक्क्मयांपेक्षा जास्त रुग्णांना प्राथमिक अँजिओप्लास्टीसाठी (स्टेंटसह बलुन अँजिओप्लास्टी) नेले जाते. अशा प्रकारे बरे झालेल्या रुग्णांचा दर 100 टक्के आहे. येथे 95 टक्क्यांपेक्षा जास्त रुग्णांना रेडिअल आर्टरीद्वारे उपचार केले जातात. मुख्य म्हणजे येथे 24 तास सेवा उपलब्ध आहे.
निरोगी हृदयासाठी योग्य अन्न सेवन करणे, दररोज फक्त 25 ग्रॅम साखरेचे सेवन करणे, 3.8 ग्रॅम मिठाचे सेवन करणे, किमान 30 मिनिटे व्यायाम करणे, मादक पदार्थांचे सेवन टाळणे आवश्यक आहे.
– डॉ. लोकनाथ बी. मदगण्णावर, एमबीबीएस, एमडीडीएम इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट