श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, बेळगाव जिल्हा शिवसेना, महाराष्ट्र एकीकरण युवा समिती, बापट गल्ली येथील कालिकादेवी युवक मंडळ यांच्यावतीने फाल्गुन वद्य तृतीया हिंदू तिथीप्रमाणे सोमवारी शिवजयंती साजरी करण्यात आली.शिवप्रतिष्ठानतर्फे शिवजयंती साजरी
प्रतिनिधी /बेळगाव
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्यावतीने फाल्गुन वद्य तृतिया या हिंदू तिथीप्रमाणे सोमवारी शहापूर येथील छत्रपती शिवाजी उद्यान येथे शिवजयंती साजरी करण्यात आली. शिवरायांच्या मूर्तीला दुग्धाभिषेक, जलाभिषेक करून जिरेटोप चढवून पुष्पहार घालण्यात आला. जिल्हाप्रमुख किरण गावडे व शहर कार्यवाह विश्वनाथ पाटील यांच्या हस्ते शिवरायांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले.
जिल्हाप्रमुख किरण गावडे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. उभे आयुष्य परकिय सत्तांना धूळ चारण्यात खर्ची घालविले. आपल्या भाषेत असणारे परकीय शब्दप्रयोग काढून मराठी राजभाषा शब्दकोष तयार केला. अशा महान राजाची जयंती आपण हिंदू तिथीप्रमाणेच केली पाहिजे. मागील 25 वर्षांपासून शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या माध्यमातून तिथीनुसार शिवजयंती साजरी केली जात असून नागरिकांनीही तिथीनुसारच शिवजयंती साजरी करावी. मागील 20 दिवसांपासून बलिदान मास पाळला जात असून, सांगली येथून येत्या काही दिवसात धर्मवीर ज्वाला आणण्यात येणार आहे. 1 एप्रिल रोजी धर्मवीर संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त मूक पदयात्रा काढून विधीवत पूजनाने ती ज्वाला शांत करण्यात येणार असल्याने यावेळी मोठय़ा संख्येने शिवभक्तांना उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी केले.
सामूहिक आरती करून उपस्थित भगिनींनी शिवरायांचा पाळणा म्हटला. ध्येयमंत्राने कार्यक्रमाची सांगता झाली. छत्रे गुरुजी, रवी जोशी व मोहन ओक यांनी पूजेचे पौरोहित्य केले. यावेळी पुंडलिक चव्हाण, अजित जाधव, अनंत चौगुले, किरण बडवाण्णाचे, नंदू चौगुले, भास्कर पाटील, अंकुश केसरकर, अभिजित अष्टेकर, गजानन पाटील, अमोल केसरकर, नितीन कुलकर्णी, अनंत कांबळे, विनायक जांगळे, गणेश जांगळे, नामदेव पिसे, विजय कुंटे, ओंकार पुजारी, वसंत आनंदाचे, युवराज पाटील, गिरीश कणेरी, महेश जांगळे, सदानंद मजुकर, मारुती पाटील, केतन मयेकर, उदित रेगे, शिवाजी गौंडाडकर, उमेश बिर्जे, गिरीश पाटील, विनायक कुंडेकर, सचिन केळवेकर, शंकर भातकांडे, महेश गावडे, गुंडू कदम, प्रमिला पाटील, सुलोचना शिंदोळकर, ईशा निलजकर, गौरी गवाने यासह महिला व शिवभक्त उपस्थित होते.
शिवसेनेतर्फे शिवजयंती साजरी
बेळगाव जिल्हा शिवसेनेच्यावतीने सोमवारी तिथीनुसार शिवजयंती करण्यात आली. शहापूर येथील छत्रपती शिवाजी उद्यान येथे शिवसेनेतर्फे पूजन करण्यात आले. शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बंडू केरवाडकर व संघटक तानाजी पावशे यांच्या हस्ते शिवरायांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले.
यावेळी शिवसेनेचे उपशहरप्रमुख राजू तुडयेकर, प्रवीण तेजम, प्रकाश राऊत, राजकुमार बोकडे, विभागप्रमुख प्रदीप सुतार, प्रकाश हेब्बाजी, निलेश इंगळे, सनी रेमाण्णाचे, आनंद जायाण्णाचे, गौरांग गेंजी, विशाल कंग्राळकर, बाळासाहेब डंगरले, राजू कणेरी यांसह शिवसैनिक उपस्थित होते.
युवा समितीतर्फे शिवजयंती साजरी
महाराष्ट्र एकीकरण युवा समितीवतीने सोमवारी तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करण्यात आली. शहापूर येथील शिवाजी उद्यान येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन अध्यक्ष शुभम शेळके यांच्या हस्ते करण्यात आले. कार्याध्यक्ष सूरज कुडुचकर, नगरसेवक शिवाजी मंडोळकर, उपाध्यक्ष अंकुश केसरकर, सचिन केळवेकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले.
यावेळी सरचिटणीस श्रीकांत कदम, दक्षिण विभाग प्रमुख प्रवीण रेडेकर, संतोष कृष्णाचे, कल्लाप्पा पाटील, गजानन निलजकर यांसह युवा समितीचे सदस्य उपस्थित होते.
बापट गल्ली येथे शिवजयंती साजरी
बापट गल्ली येथील कालिकादेवी युवक मंडळाच्या वतीने हिंदू तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करण्यात आली. गल्लीतील महिलांनी पाळणा म्हणून शिवरायांची आरती म्हटली. सुनिल मुरकुटे व कालिकादेवी युवक मंडळाचे अध्यक्ष अंकुश केसरकर यांच्या हस्ते शिवरायांच्या मूर्तीचे पुजन करण्यात आले.
उपाध्यक्ष गजानन निलजकर यांनी तिथीप्रमाणे जयंती साजरी करण्याबाबत माहिती दिली. या कार्यक्रमाला सुवर्णा कणबरकर, आशा केसरकर, लक्ष्मी निलजकर, वर्षा जाधव, सविता पाटील, गोपाळराव केसरकर, महादेव किल्लेकर, भाऊ किल्लेकर, महादेव केसरकर, महेश पावले, राजेंद्र किल्लेकर, शुभम मोरे, अमोल केसरकर, महेश जाधव, चेतन केसरकर यासह गल्लीतील नागरिक उपस्थित होते.