15 हजार वर्षांपासून बर्फात : अमेरिकेकडून संशोधन
वृत्तसंस्था /ल्हासा
तिबेटच्या ग्लेशियरमध्ये 15 हजार वर्षे जुन्या बर्फात 33 विषाणू मिळाले आहेत. यातील 28 असे नवे विषाणू आहेत, ज्यांच्याबद्दल वैज्ञानिकांकडे कुठलीच माहिती नाही. या विषाणूंवर अमेरिकेच्या स्टेट ओहियो युनिव्हर्सिटीच्या वैज्ञानिकांनी संशोधन चालविले आहे.
15 हजार वर्षांपूर्वीचा हा बर्फ कुनलुन शानच्या गुलिया आइस कॅपमधून प्राप्त केला होता. हा भाग तिबेट पठारमध्ये मोडतो. या विषाणूंचे परीक्षण केल्यावर वैज्ञानिकांनी ते माती किंवा रोपांमध्ये आढळून येत असल्याचे म्हटले आहे. विषाणूंचा शोध घेणाऱया पथकानुसार वैज्ञानिकांच्या मदतीने हे विषाणू अनेक शतकांपर्यंत कसे जिवंत राहिले हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. ओहियो स्टेट युनिव्हर्सिटीचे संशोधन झी-पिंग झॉन्ग यांनी हे संशोधन मायक्रोबायोलॉजिस्ट आणि पूरविषयक तज्ञांनी मिळून केल्याचे सांगितले आहे.
नमुन्यांमध्ये असलेल्या 33 विषाणूंच्या जेनेटिक कोडचे विश्लेषण करण्यात आले असून यातील 28 विषाणू नव्याप्रकारचे होते. उर्वरित विषाणू सर्वसाधारणपणे बॅक्टेरियाला संक्रमित करतात. हे विषाणू अत्यंत प्रतिकूल स्थितीत तग धरू शकतात.