ऑनलाईन टीम / तिबेट :
भारताशेजारील देश तिबेटमध्ये बुधवारी पहाटे 1.37 मिनिटांनी भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता 6.2 रिश्टर स्केल एवढी होती. सुदैवाने यात कोणत्याही जीवित अथवा वित्त हानीचे वृत्त नाही.
याआधी देखील एक आठवड्यापूर्वी अंदमान निकोबारमध्ये मध्यम तीव्रतेचे 5 धक्के जाणवले होते. यांची तीव्रता 4.5 रिश्टर स्केल इतकी होती.