प्रतिनिधी / पणजी
तियात्र अकादमीतर्फे अन्तोनीओ मोराईस यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरवात अन्तोनिओ मोराईस यांच्या प्रतिमेला फुले वाहून करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर तियात्र अकादमीचे अध्यक्ष मिनीनो फर्नांडिस, उपाध्यक्ष मारीओ मीनेझीस व सदस्य सचिव सुरेश दिवकर उपस्थित होते.
अध्यक्ष मिनीनो फर्नांडिस व उपाध्यक्ष मारीओ मिनेझिस यांनी तियात्रिस्ट अन्तोनिओ मोराईस यांच्याबद्दल माहिती सांगितली व आपले मनोगत व्यक्त केले. मेलीटा रॉड्रीग्स हीने कार्यक्रमाची प्रस्तावना व उपस्थितांचे आभार व्यक्त केले. यावेळी तियात्र अकादमीचे कर्मचारी मेलीटा रोड्रीग्स, शैलेश आमोणकर, माफाल्दीना मोराईस, सिद्धेश ताम्हणकर, संजय आमोणकर, संस्कृतिक आयोजक विजया तारी व ग्रंथपाल मानसी महेंद्र बांदोडकर उपस्थित होते.