दुबई
येथे सुरू असलेल्या विश्व पॅरा तिरंदाजी स्पर्धेत भारताची महिला तिरंदाजपटू 24 वर्षीय पूजाने वैयक्तिक गटात अंतिम फेरी गाठताना ब्रिटनच्या हॅजेल चेस्टीचा पराभव केला.
शनिवारी झालेल्या वैयक्तिक गटातील तिरंदाजीमध्ये पूजाने चेस्टीचा 6-2 असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. या कामगिरीमुळे भारताने या स्पर्धेतील आपले किमान दुसरे रौप्यपदक निश्चित केले आहे. पूजाची अंतिम लढत इटलीच्या विन्सेनझा बरोबर होणार आहे. स्पर्धेच्या गुणतक्त्यात भारताने दुसरे स्थान मिळविले आहे. या स्पर्धेत भारताच्या शामसुंदर स्वामी आणि ज्योती बलियान यांनी कंपाऊंड मिश्र सांघिक प्रकारात पहिले रौप्यपदक मिळविले आहे.