वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दुबईत सुरू असलेल्या फेझा विश्व मानांकन तिरंदाजी स्पर्धेत भारताचा तिरंदाज राकेशकुमारने कंपाउंड प्रकारात सुवर्णपदक पटकाविले. तसेच रिकर्व्ह मिश्र सांघिक प्रकारात भारताच्या हरविंदर सिंग आणि पुजा यांनीही सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.
पुरूषांच्या कंपाउंड प्रकारात राकेशकुमारने आपल्याच देशाच्या शामसुंदरचा 143-135 गुणांनी पराभव करत सुवर्णपदक पटकाविले. रिकर्व्ह मिश्र सांघिक प्रकारात हरविंदर आणि पुजा यांनी तुर्कीच्या संघावर विजय मिळवीत सुवर्णपदक घेतले. कंपाउंड मिश्र सांघिक प्रकारात भारताच्या शामसुंदर आणि ज्योती बलियान यांनी रौप्यपदक पटकाविले. या स्पर्धेत 11 देशांचे 70 तिरंदाज सहभागी झाले आहेत.