वृत्तसंस्था/ पुणे
येथील सेनादलाच्या क्रीडा संकुलामध्ये भारतीय तिरंदाजी संघाला प्रशिक्षण दिले जात आहे. दरम्यान या संघाला प्रशिक्षण देणाऱया प्रशिक्षक वर्गातील एका सदस्याला कोरोनाची बाधा झाल्याचे साईच्या प्रवक्त्याने सांगितले.
भारतीय तिरंदाजासाठी सराव प्रशिक्षण शिबीर येथे सुरू करण्यात आले होते. आता साहाय्यक प्रशिक्षक सदस्याला कोरोनाची लागण झाल्याने दोन दिवस हे सराव शिबीर थांबविण्यात आले आहे. 30 ऑक्टोबर रोजी या सदस्याची कोरोना चांचणी घेण्यात आली. त्यावेळी त्याला कोरोनाची बाधा झाल्याचे आढळून आले. सेनादलाच्या क्रीडा संकुलाबाहेर पुण्यातील एका खास रूग्णालयात या सदस्यावर वैद्यकीय इलाज सुरू आहे. सदर कोरोना बाधित सदस्याला 14 दिवसांसाठी यापूर्वी क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले होते.