प्रतिनिधी / खेड
वेरावल स्थानकात खड्डालाईन ब्लॉकमुळे कोकण मार्गावरुन धावणाऱ्या तिरुअनंतपूरम-वेरावल साप्ताहिक एक्सप्रेसच्या डिसेंबर महिन्यातील फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. तिरूअनंतपूरम-वेरावल साप्ताहिक एक्सप्रेसच्या ७, १४, २१, २८ डिसेंबर व परतीच्या प्रवासात १०, १७, २४, ३१ डिसेंबर याकालावधीतील फेऱ्या रद्द करण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.