तेलंगणात 1800 कोटींचा मंदिर प्रकल्प : 1850 एकरमध्ये फैलावलेले विशाल मंदिर
हैदराबादपासून 70 किलोमीटर अंतरावर यदागिरीगट्टा पर्वतावर यदाद्रि बालाजी मंदिराची उभारणी होत आहे. 1850 एकरामध्ये फैलावलेल्या या विशाल मंदिराने भव्य आकार घेतला आहे. तिरुपति मंदिर आंध्रमध्ये राहिल्याची खंत राहिल्यावर तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी 2017 पासून या मंदिर परिसराचा विकास हाती घेतला आहे.
या पूर्ण प्रकल्पासाठी 1800 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. आतापर्यंत 852 कोटी रुपये खर्च झाले आहेत. यातील 248 कोटी रुपये मंदिर उभारणीकरता खर्च झाले आहेत. उर्वरित रक्कम भूमी अधिग्रहण पायाभूत विकास आणि चारपदरी मार्गाकरता खर्च झाल्याचे समजते. पण शासकीय निधीतून मंदिर उभारणी केल्याप्रकरणी केसीआर यांच्यावर टीका देखील होत आहे. यदागिरीगट्टानजीकच्या डोंगरक्षेत्रामधील 252 घरांची विक्री प्रत्येकी 1.5 कोटी रुपयांमध्ये झाली आहे. खरेदीदार वर्षातील 30 दिवस या घरांमध्ये वास्तव्य करू शकणार आहे. उर्वरित दिवस भाविक या घरांमध्ये वास्तव्य करू शकतील. मंदिर परिसराच्या 3 बाजूला 4.5 फूट जाडीची रिटेनिंग भिंत उभी करण्यात येणार आहे. 60 पौराणिक मंदिरांच्या वास्तूमधून प्रेरणा घेत याची निर्मिती झाली आहे. मंदिरातील गर्भगृहाला 700 किलो सोन्याच्या मदतीने दोन मिलीमीटरचा मुलामा देण्यात येणार आहे. तर 500 मूर्तिकारांनी दोन वर्षापर्यंत दिवसराक्ष काम करून मूर्ती तयार केल्या आहेत.