प्रवाशांच्या प्रतिसादाअभावी रेल्वे विभागाचा निर्णय
प्रतिनिधी / बेळगाव
तिरुपती-कोल्हापूर-तिरुपती मार्गावर धावणारी एक्स्प्रेस काही दिवसांसाठी रद्द करण्याचा निर्णय रेल्वे विभागाने घेतला आहे. कोरोना व लॉकडाऊनमुळे प्रवाशांच्या संख्येत घट झाल्यामुळे साऊथ सेंट्रल रेल्वेने हा निर्णय घेतला आहे.
तिरुपती-कोल्हापूर (07415) ही रेल्वे दि. 26 ते 31 मे दरम्यान रद्द करण्यात आली आहे. तर कोल्हापूर-तिरुपती (07416) ही रेल्वे दि. 28 ते 2 जून दरम्यान रद्द करण्यात आली आहे. कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने रेल्वे प्रवासाला अत्यल्प प्रतिसाद मिळत असल्याने रेल्वेने हा निर्णय घेतला आहे.