ऑनलाईन टीम / तरुण भारत
गेले सात दिवस युक्रेन आणि रशिया यांच्यात युद्धाचा भडका उडाला असुन युक्रेनमध्ये अऩेक देशातील नागरिक अडकल्याने जगातील अनेक देश चिंतेत असल्याचे चित्र आहे. या युद्धात अत्तापर्यंत दोन्ही देशांकडून क्षेपणास्त्राचा वापर झाला असुन दोन्ही देश एकमेकांचे सर्वंकष नुकसान करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत आहेत. यातुन जगाला ही या युद्धाची ही चिंता लागली असुन हे युद्ध कोणत्या स्तरापर्यंत पोहोचणार याची धास्ती आहे. यामध्ये अण्वस्त्रांचा वापर होणार का ? हा प्रश्न सर्वांना सतावतो आहे. रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी याबद्दल एक सूचक विधान केलं आहे.
लावरोव्ह यांनी बुधवारी तिसरं विश्वयुद्ध झालं तर ते नक्कीच अण्विक असेल असं म्हटलंय. “तिसरं विश्वयुद्ध झाल्यास त्यामध्ये अणवस्त्रांचा वापर होईल आणि ते फार विद्धवंसक असेल,” असं लावरोव्ह म्हटल्याचं आरआयए या वृत्तसंस्थेनं म्हटलंय. सर्गेई लावरोव्ह यांनी रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याचं समर्थन करताना किव्हला म्हणजेच युक्रेनला अण्वस्त्रं मिळाली तर ते रशियासाठी फार धोकादायक ठरु शकतं असं म्हटलं आहे. सर्गेई लावरोव्ह यांनी युक्रेनकडे अणवस्त्र असण्याला रशियाला कायमच विरोध करेल असे संकेतही दिले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार गेल्या सहा दिवसात युक्रेनच्या सामान्य नागरीकांचे आतोनात हाल सुरु असले तरी रशियाचे 6000 सैन्य या युद्धात कामी आले आहे. यामुळे युद्धाची झळ दोन्ही देशांना आणि अप्रत्यक्षरित्या संपुर्ण जगाला ही बसणार आहे. त्यामुळे प्रश्न कोणता ही असला तरी चर्चेतुन मार्ग काढणे आवश्यक आहे. मात्र माघार घेणार कोण या प्रश्नावर अद्याप तरी उत्तर न मिळाल्याने हे द्वंद सुरुच आहे.