कोल्हापूर /प्रतिनिधी
कोल्हापुरात शारदीय नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त अंबाबाईची दररोज वेगवेगळ्या रूपात पूजा मांडली जाते . कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या वर्षी मंदिर बंद असल्याने भाविकांना प्रवेश नाही , परंतु देवीचा नित्यपूजा चालू आहेत . आजची पूजा नागकृत महालक्ष्मी स्तवन रूपात बांधलेली आहे . करवीर निवासिनी पन्नागालयातील म्हणजेच पन्हाळ्यावरील नागांना दर्शन देत विराजमान झाली आहे .
या प्रसंगाची पार्श्वभूमी अशी – पराशर मुनींच्या पन्हाळ्यावरील विष्णूरुपी पुत्रप्राप्तीसाठीच्या तपसाधनेची झळ लोकांना होऊ लागते . त्यासाठी ते पराशरांच्या तपात विघ्न आणतात ,परंतु शेवटी शापभयाने नागलोक पराशर यांना शरण जातात आणि सुरक्षित राहण्यास योग्य जागेविषयी विचारतात . तेव्हा पराशर मुनी त्यांना करवीर क्षेत्री जाऊन श्री महालक्ष्मीचे दर्शन घेऊन तिलाच विचारण्यास सांगतात . तेव्हा नागलोक महालक्ष्मीचे दर्शन घेऊन तिची स्तुती करतात , त्यामुळे आजची पूजा नाग लोक महालक्ष्मी स्तवन रूपात बांधण्यात आलेली आहे .ही पूजा श्रीपूजक मकरंद मुनीश्वर आणि माधव मुनिश्वर यांनी बांधली.