फाटकावरील काम पूर्ण होण्यासाठी आणखी वर्षाचा कालावधी लागण्याची शक्मयता : चार पदरी उड्डाणपुलाची उभारणी करणार
प्रतिनिधी / बेळगाव
तिसऱया रेल्वे फाटकावर उड्डाणपुलाचे काम सुरू असून, एका बाजूचे पुलाचे काम अंतिम टप्प्यात आहे. पुलाला जोडण्यासाठी रॅम्पची उभारणी करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. लवकरच पुलाच्या काँक्रिटीकरणाचे काम करून एका बाजूचा पूल वाहतुकीसाठी खुला करण्याकरिता रेल्वे खात्याने प्रयत्न चालविले आहेत. तिसऱया रेल्वे फाटकावरील उड्डाणपुलाचे काम संथगतीने सुरू असल्याने आतापर्यंत केवळ एका बाजूचा उड्डाणपूल तयार होत आला आहे. या ठिकाणी चार पदरी उड्डाणपुलाची उभारणी करण्यात येणार असून, सध्या एका बाजूला दुपदरी उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. कोरोना विषाणूंचा प्रसार झाल्याने मार्चपासून हे काम चार महिन्यांसाठी बंद ठेवण्यात आले होते. त्यानंतर उड्डाणपुलाचे काम सुरू करण्यासाठी रेल्वे खात्याने प्रयत्न केले. मात्र बिहार, झारखंड, नोएडा अशा विविध राज्यांतील कामगार परत आले नसल्याने उड्डाणपुलाचे काम करणे कठीण बनले होते. कामगार मागविण्यासाठी बराच प्रयत्न करण्यात आला. मात्र, स्थानिक कामगारांना घेऊन काम करण्याची वेळ कंत्राटदारावर आली. कुशल कारागीर नसल्याने उड्डाणपुलाची उभारणी करणे अडचणीचे बनले होते. काही महिन्यांनंतर कामगार परत आल्याने उड्डाणपुलाच्या कामाला गती प्राप्त झाली आहे. उड्डाणपुलाच्या पिलरची उभारणी केल्यानंतर ट्रॉझल बिम घालून काँक्रिटीकरणासाठी तयारी केली आहे. एका बाजूच्या पुलाचे काम तातडीने पूर्ण करण्याच्या हेतूने युद्धपातळीवर काम सुरू असून, रॅम्प उभारणीसाठीदेखील खोदाई करण्यात आली आहे. रॅम्प उभारणीबरोबर काँक्रिटीकरण करून उड्डाणपूल लवकर खुला करण्यात येणार आहे. त्यानंतर दुसऱया बाजूच्या उड्डाणपुलाचे काम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. त्यामुळे तिसऱया फाटकावरील उड्डाणपूल उभारणीचे काम पूर्ण करण्यासाठी आणखी वर्षाचा कालावधी लागण्याची शक्मयता आहे.