प्रतिनिधी / बेळगाव
रेल्वे मार्गाची दुरुस्ती करण्यात येणार असल्याने शुक्रवार दि. 12 रोजी तिसरे रेल्वेगेट बंद ठेवण्यात येणार आहे. सकाळी आठ वाजल्यापासून रात्री आठ वाजेपर्यंत दिवसभर रेल्वेगेट बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे वाहनचालकांनी इतर पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन नैर्त्रुत्य रेल्वेकडून करण्यात आले आहे.
मंगळवारी चौथ्या रेल्वेगेटचे काम पूर्ण झाल्यानंतर आता तिसऱया रेल्वेगेटचे काम हाती घेण्यात आले आहे. यावेळी ट्रकच्या बाजूला खडी घालणे यासह इतर कामे केली जाणार आहेत.