क्रिसिलने वर्तवला अंदाज : विक्री 8 ते 10 टक्के कमी राहणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशामध्ये दुचाकी वाहनांच्या विक्रीत चालू आर्थिक वर्षामध्ये 8 ते 10 टक्क्यांपर्यंत घसरण राहण्याचे संकेत आहेत. ग्रामीण भागात मागणी कमी झाली असून सणासुदीच्या काळात कमी विप्री, वाढलेल्या किमती आणि ग्राहकांची नजर इलेक्ट्रिक वाहनांवर अधिक प्रमाणात राहत असल्याने दुचाकी वाहनांच्या विक्रीत घसरण राहणार असल्याचा अंदाज क्रिसिल रेटिंग यांच्याकडून मांडण्यात आला आहे.
देशातील रेटिंग एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार चालू आर्थिक वर्षात विक्रीत घसरण राहणार असल्याचा अंदाज पहिल्यापासूनच आहे. वर्ष 2021 मध्ये दुचाकी वाहनांच्या विक्रीत 13 टक्के आणि 2020 मध्ये 18 टक्क्यांपर्यंत घट दिसली होती.
मागील एक दशकापेक्षा अधिक कालावधीपासून असे पहिल्यांदाच झाले आहे. ज्यामध्ये दुचाकी वाहनांची विक्री सलग तिसऱया आर्थिक वर्षात घसरणीत राहणार असल्याची माहिती एजन्सीने दिली असून दुसऱया बाजूला वाहनांच्या विक्रीमध्ये चालू आर्थिक वर्षात जवळपास 8 ते 9 टक्क्यांची घसरण पहावयास मिळू शकते.
ग्रामीणमध्ये मागणी प्रभावीत
कोरोनाच्या दुसऱया, तिसऱया लाटेमध्ये शेती उत्पादनाला होणारा उशीर यामुळे दुचाकींची ग्रामीण भागातील मागणी प्रभावीत झाली आहे.