प्रतिनिधी/ बेळगाव
सरकारी कर्मचाऱयांचा दर्जा मिळावा, या मागणीसाठी राज्यातील परिवहन कर्मचारी शुक्रवारपासून संपावर आहेत. सलग तिसऱया दिवशी रविवारीही संप करण्यात आला. एकीकडे संप सुरू असतानाच दुसरीकडे मात्र प्रवाशांचे अतोनात हाल झाले. प्रवाशांना येण्या जाण्यासाठी खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत होता. अनेकांना तर मॅक्सिकॅब व टेम्पोची तासन्तास वाट पहावी लागल्याने प्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत होता.
रविवारी सकाळपासूनच बेळगावच्या मध्यवर्ती बसस्थानकात कर्मचाऱयांनी आंदोलन सुरू केले. आंदोलन उग्र होऊन कोणत्याही बसचे नुकसान होऊ नये याची खबरदारी घेऊन सर्व बसेस डेपोमध्ये लावण्यात आल्या. यामुळे संपूर्ण बसस्थानकावर आंदोलक कर्मचारी वगळता शुकशुकाट होता. तसेच पोलिसांचा कडक बंदोबस्त मध्यवर्ती बसस्थानक परिसरात ठेवण्यात आला होता.
कर्मचाऱयांनी आपल्या मुलाबाळांसह आंदोलन केले. आमच्या हा अस्तित्वाचा प्रश्न असल्याने आता माघार घेणार नाही, असा इशारा कर्मचारी देत होते. तर कर्मचाऱयांच्या कुटुंबीयांनी डोक्मयावर वीटा ठेवून वेगळय़ा पद्धतीने आंदोलन छेडले.
प्रवाशांना खासगी सेवेचा पर्याय
परिवहनच्या बसेस बंद असल्यामुळे प्रवाशांना खासगी सेवेवर अवलंबून रहावे लागले. हुबळी-कोल्हापूरकडे जाणाऱयांनी राष्ट्रीय महामार्गावर जाऊन मिळेल त्या वाहनाने प्रवास करण्याचा निर्णय घेतल्याने महामार्गाशेजारी प्रवाशांची गर्दी दिसत होती. तसेच लांबपल्ल्याच्या प्रवासासाठी लक्झरी बस सुरू ठेवण्यात आल्या होत्या. या बस पकडण्यासाठी कोल्हापूर सर्कल, रामदेव हॉटेल परिसरात प्रवासी उभे असल्याचे दिसून आले.
महाराष्ट्राच्या तुरळक बसेस दाखल
कर्नाटक राज्य परिवहन कर्मचाऱयांचे आंदोलन सुरू असले तरी महाराष्ट्रातून मात्र काही प्रमाणात बसेस दाखल होत होत्या. रविवारी आजरा, सावंतवाडी, गडहिंग्लज, चंदगड या परिसरातील बसेस युनियन जिमखाना परिसरातील चंदगड बसस्टॉपपर्यंत येत होत्या. त्यातूनच त्या परतून पुन्हा मार्गस्थ होत होत्या. त्यामुळे या परिसरात जाणाऱयांना या बसचा आधार घ्यावा लागला.
ग्रामीण भागातील सेवा कोलमडली
मध्यवर्ती बसस्थानकातून दररोज शेकडो बस ग्रामीण भागात जातात. परंतु बस बंद असल्याने ग्रामीण भागातील वाहतूक सेवा पूर्णपणे कोलमडली आहे. मॅक्सिकॅब, टेम्पो यांचा आधार घेऊन ग्रामीण भागातील नागरिकांना शहर गाठावे लागत होते. बस बंद असल्याने आजारी असणाऱया नागरिकांचे मात्र पुरते हाल झाले. जादा पैसे खर्च करून त्यांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत होता.