सेन्सेक्स 185 तर निफ्टी 64.75 अंकांनी तेजीत
वृत्तसंस्था / मुंबई
चालू आठवडय़ातील पहिल्या दिवशी उच्चांकी घसरण नोंदवल्यानंतर मात्र शेअर बाजार सावरण्यास सुरुवात झाल्याचे पहावयास मिळाले आहे. यामध्ये मंगळवारी आणि बुधवारी सलग तेजी नोंदवत सेन्सेक्स निफ्टी बंद झाले आहेत. सकाळी सेन्सेक्सने 8 अंकांनी हलक्या घसरणीसोबत 38,892.64 वर प्रारंभ केला होता.
दिवसभरातील कामगिरीनंतर सेन्सेक्स 185.23 अंकांनी वधारुन निर्देशांक 39,086.03 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 64.75 अंकांनी वाढून 11,535.00 वर स्थिरावला होता. तसेच निफ्टीमध्ये बुधवारी भारती इंफ्राटेलचे समभाग चार टक्के आणि झी एन्टरटेन्मेंटचे समभाग 8 टक्क्मयांची तेजी नोंदवत बंद झाले आहेत.
सुरुवातीच्या कालावधीत शेअर बाजारातील व्यवहारात बँकिंगचे समभाग मोरोटोरियमच्या कारणामुळे दबावात राहिले होते. प्रमुख कंपन्यांमध्ये झी एन्टरटेनमेंटचे समभाग सर्वाधिक 7.46 टक्क्मयांनी वधारले आहेत. सोबत महिंद्रा ऍण्ड महिंद्रा 6.13, टाटा मोटर्स 5.11, भारती इंफ्राटेल 3.84, अदानी पोर्ट 3.25 टक्क्मयांनी तेजीत राहिले आहेत. बजाज ऑटो 2.38, हीरोमोटो कॉर्प 1.45, एशियन पेन्ट्स 1.40, एचडीएफसी बँकेचे समभाग 1.30 आणि नेस्ले इंडियाचे समभाग 1.25 टक्क्मयांनी घसरले आहेत.
एजीआर निर्णयाचा प्रभाव
मागील काही दिवसांपासून दूरसंचार कंपन्यांचा एजीआर विषय मोठय़ा प्रमाणात चर्चेत राहिलेला आहे. यावर सर्वोच्च न्यायालयात सुनवाणी सुरु होती. यावर मंगळवारी एजीआरची थकबाकी देण्यासाठी 10 वर्षाची मुदत दिल्याचा निर्णय जाहीर झाला आहे. याचा सकारात्मक परिणाम मात्र बुधवारी शेअर बाजारावर पडल्याचे दिसून आले आहे. यामध्ये व्होडाफोन आयडीयाचे समभाग 12 टक्क्मयांनी तेजीत राहिले आहेत. काल मात्र हेच समभाग 12 टक्क्मयांच्या घसरणीसह बंद झाले होते.