रिलायन्सचे समभाग चार टक्क्मयांनी नुकसानीत
वृत्तसंस्था/ मुंबई
चालू आठवडय़ात भारतीय शेअर बाजारात चढउताराचे वातावरण राहिले आहे. पहिल्या दिवशी सोमवारी बाजार घसरला तर मंगळवारी तेजीत राहून पुन्हा बुधवारी सेन्सेक्स 422 अंकांनी घसरण नोंदवत बाजार बंद झाला आहे. दिवसअखेर सेन्सेक्स 421.82 अंकांनी घसरुन निर्देशांक 38,071.13 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 97.70 अंकांनी घसरुन निर्देशांक 11,202.85 वर बंद झाला आहे.
दिग्गज कंपन्यांमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचे समभाग सर्वाधिक चार टक्क्मयांनी घसरले आहेत. अन्य कंपन्यांमध्ये नेस्ले इंडिया, एचसीएल टेक, महिंद्रा यांचे समभाग घसरणीसह बंद झाले आहेत. अन्य कंपन्यांमध्ये मात्र इंडसइंड बँक, टाटा स्टील, सनफार्मा, बजाज फायनान्स, लार्सन ऍण्ड टुब्रो व स्टेट बँक यांचे समभाग नफ्यात राहिले होते.
प्रमुख समभागांमध्ये काही गुंतवणूकदारांच्या नफ्यात कपात झाली आहे. यासोबतच अमेरिकेच्या केंद्रीय बँक फेडरल रिझर्व्हच्या नियोजित बैठकीच्या अगोदरच गुंतवणूकदारांनी सावधानता बाळगली आहे. देशात कोविड19 च्या वाढत्या प्रकरणामुळे गुंतवणूकदार मोठय़ा काळजीत पडले आहेत. कारण बुधवारी देशात कोविड संसर्गाने 15 लाखाचा आकडा पार केला आहे. यामुळे शेअर बाजाराची वाटचाल दबावामध्ये राहणार असल्याचे संकेत अभ्यासकांनी व्यक्त केले आहेत.
विविध घडामोडींमध्ये एका दिवसात नवीन कोविड रुग्णांची संख्या 48,513 नोंदवण्यात आली आहे. तर अन्य आशियाई बाजारात चीनचा शांघाय, हाँगकाँगचा हँगसेंग व दक्षिण कोरियाचा कॉस्पी हे बाजार तेजीत राहिले आहेत. याच वेळी जपानचा बाजार निक्की मात्र घसरणीसोबत बंद झाला आहे. जागतिक मानक ब्रेंट कच्चे तेल वायदा 1.28 टक्क्मयांनी वधारुन 44.17 डॉलर प्रति बॅरेलवर राहिले आहे. अंतरबँक विदेशी मुद्रा विनिमय बाजारामध्ये रुपया चार पैशांनी वाढून 74.80 प्रति डॉलरवर बंद झाला आहे.