उड्डाणपुलाच्या कामाला गती : एकूण प्रकल्प 38 कोटी रुपयांचा, गर्डरची लांबी 580 मीटर तर रुंदी 12 मीटर असून एकूण वजन 320 टन
प्रतिनिधी /बेळगाव
तिसऱया रेल्वेगेटजवळील उड्डाणपुलाचे काम बरेच महिने रेंगाळले असले तरी आता या कामाने गती घेतली आहे. शुक्रवारी पुलावर गर्डर बसविण्याच्या कामाला प्रारंभ झाला आहे. रेल्वे खात्याने हिरवा कंदील दाखविल्यानंतर साधारण 12 च्या सुमारास हे काम सुरू झाले. जवळजवळ तीन तास या कामासाठी मिळाले. अर्थात काम पूर्ण होण्यास अजूनही दोन दिवसांचा कालावधी लागणार आहे.
गर्डर बसविणे हे तसे अत्यंत कठीण आणि आव्हानात्मक काम आहे. इनफ्रा प्रोजेक्ट प्रा. लि. या कंपनीने हे काम घेतले असून जून 2019 मध्ये कामाला सुरुवात झाली आहे. तत्कालीन रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले होते. परंतु नंतर 6 महिने परवानगीसाठी हे काम रेंगाळले.
जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, रेल्वे विभाग यांची बैठक होऊन कामाला सुरुवात करण्याची मान्यता मिळाली. त्यानंतर जानेवारी 2020 मध्ये हे काम सुरू झाले. परंतु पुन्हा अडथळय़ांची मालिका सुरू झाली. कोरोना आणि तो आटोक्मयात आल्यानंतर धुवांधार पडलेला पाऊस यामुळे हे काम पुन्हा स्थगित झाले. कोविड काळात कंपनीने घेतलेले कंत्राटी कामगार पुन्हा आपल्या मूळगावी परत गेले. त्यांना परत आणण्यासाठी कोणतीच वाहतूक सुविधा कोविड काळात उपलब्ध नक्हती.
लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर ऑगस्टमध्ये कंपनीने चक्क विमानाने सुविधा उपलब्ध करून केरळ, कोलकाता, आसाम येथून कामगारांना बेळगावला आणले. गेल्या तीन महिन्यांत फॅब्रिकेशन काम पूर्ण झाले. गर्डरच्या फॅब्रिकेशनचे काम हैदराबाद येथे वॉल्सन ब्रिजीस येथून करून घेण्यात आले आहे. हा एकूण प्रकल्प 38 कोटी रुपयांचा असून गर्डरची रुंदी 12 मीटर तर लांबी 580 मीटर आहे. एकूण 320 टनाचा हा गर्डर आहे.
किमान 100 वर्षे पूल टिकून राहील
काम पूर्ण होण्यास विलंब झाला. परंतु त्यामध्ये अनेक नैसर्गिक अडचणी आल्या. त्यामुळे आमचा नाईलाज झाला. आता कामाने गती घेतली आहे. गर्डर बसविणे खूप आव्हानात्मक तितकेच कौशल्यपूर्ण काम आहे. कंपनीच्या कामाचा दर्जा उत्कृष्ट असून किमान 100 वर्षे हा पूल टिकून राहील, याची खात्री आहे.
मंजुनाथ-व्यवस्थापक इनफ्रा प्रोजेक्ट