प्रतिनिधी/ बेळगाव
तिसऱया लाटेसाठी जिल्हा प्रशासनाने सर्व ती तयारी पूर्ण केली होती. तरी देखील रुग्ण संख्या वाढत चालली आहे. 1 जानेवारी ते सोमवार दि. 24 जानेवारीपर्यंत 1 लाख 5 हजार 233 जणांचे स्वॅब घेण्यात आले होते. त्यामध्ये 6 हजार 338 जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर त्यापैकी 1 हजार 543 जण बरे झाले आहेत. तर सध्या 4 हजार 833 सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने आयोजित केलेल्या बैठकीत देण्यात आली.
सक्रिय रुग्णांपैकी 4 हजार 593 जणांवर घरीच उपचार करण्यात येत आहेत. तर 240 जणांवर सरकारी व खासगी इस्पितळांमध्ये उपचार करण्यात येत असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. जिह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह दर शेकडा 5.97 टक्के इतका आहे. तर कोरोनामुक्त होण्याचा शेकडा 24.17 असा दर असल्याचे पत्रकात म्हटले आहे.
गेल्या 24 दिवसांमध्ये 7 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. रुग्ण संख्या वाढत चालली तरी मृत्यूचे प्रमाण मात्र कमी आहे. रुग्णांवर उपचार करण्यासाठी सर्व ती तयारी पूर्ण केली आहे. जिह्यामध्ये एकूण 23 तालुका आरोग्य केंद्र तसेच इतर 19 उपकेंदे आणि 51 खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी तयारी करण्यात आली आहे. व्हेंटीलेटर तसेच ऑक्सीजनची उपलब्धता मुबलक प्रमाणात आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारची काळजी करण्याची गरज नाही. कोरोनावर नजर ठेवण्यासाठी तज्ञ समितीची नियुक्ती करण्यात आली आहे. त्या समितीमार्फत सर्व प्रकारे काळजी घेतली जात असल्याचे पत्रकात म्हटले आहे.
विशेष करुन लहान मुलांवर उपचार करण्यासाठी अनेक हॉस्पिटलमध्ये जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे भितीचे काहीच कारण नसल्याचेही आरोग्य विभागाने म्हटले आहे. जिह्यामध्ये लसीकरण मोहीमही तीव्र गतीने राबविण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात 101.29 टक्के लसीकरण मोहीम यशस्वी झाली आहे. एकूण 36 लाख 11 हजार 869 जणांना लस दिली गेली आहे. दुसरा डोस देखील 87.64 टक्के दिला गेला आहे. एकूण 31 लाख 25 हजार 205 जणांना डोस देण्यात आला आहे.
जिह्यातील विद्यार्थ्यांनाही लस देण्यासाठी जोरदार मोहीम राबविण्यात आली आहे. 2 लाख 47 हजार 91 विद्यार्थी 18 वर्षांपेक्षा वरील आहेत. त्यामधील 1 लाख 86 हजार 407 विद्यार्थ्यांना पहिला डोस दिला गेला आहे. विद्यार्थ्यांनाही लस देण्यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत. 75 टक्क्मयांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना लस देण्यात आली आहे, असे सांगण्यात आले.