प्रतिनिधी /तिसवाडी
राज्यातील प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था या गेल्या अनेक दशकांपासून शिक्षकांना आर्थिक अडीअडचणीवर मात करणा-या ठरलेल्या असून, त्यांची उत्तरोत्तर प्रगती व्हावी या करीता शिक्षकांनी प्रयत्नशील राहावे असे उद्गार गोवा राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष श्री. प्रकाश गांवकर यांनी काढले.
तिसवाडी तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या 39व्या वार्षिक आमसभेनिमीत्त येथे आयोजीत केलेल्या निवृत्त शिक्षक सभासद सत्कार व गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळय़ात गांवकर प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपिठावर संस्थेचे अध्यक्ष श्री. सिताराम नाईक व निवृत्त शिक्षीका भारती तळकर उपस्थित होत्या.
पतसंस्था ही केवळ निवडून दिलेल्या संचालक मंडळाची नसते. तर ती आपणा सर्व भागधारकांची असते. त्यामुळे प्रत्येकाने तिच्या उत्कर्षासाठी झटले पाहिजे व तिचा फायदा करून घेतला पाहिजे असे गांवकर पुढे म्हणाले.
संस्थेचे अध्यक्ष सिताराम नाईक यांनी स्वागत करताना, संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला व तालुक्मयातील सर्व सरकारी प्राथमिक शिक्षकांच्या सहकार्याने ही संस्था दर वषी ’अ’ श्रेणी प्राप्त करते असे सांगितले.
यावेळी निवृत्त शिक्षिका भारती तळकर यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे विद्यार्थी श्रीया नाईक, मनस्वी कुडाळकर, सिया विश्वेश नाईक, अंतरिक्ष वेळुस्कर व खुशी नाईक यांचा गौरव करण्यात आला.
संचालक मंडळाच्या सदस्यांनी गायिलेल्या स्वागतगिताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्या शिरोडकरने केले तर आभार उपाध्यक्ष दिपीका कवळेकार यांनी मानले.
तद्न?तर झालेल्या आमसभेचे कामकाज सचिव अजित खोलकर यांनी हाताळले. 2021 -22या वषी 8 टक्के लाभांश वाटणीस आमसभेत मान्यता देण्यात आली.