वार्ताहर/ उसगाव
तिस्क उसगाव येथील पीडीए मार्केटच्या छप्परावरील स्लॅबचा काही भाग बुधवारी रात्री कोसळून पडला. या घटनेमध्ये एक युवक जखमी झाला असून त्याला उपचारासाठी पिळये आरोग्य केंद्रात पाठविण्यात आले.
पीडीए मार्केटमध्ये नियमित बाजार भरत असून ग्राहकांची कायम या ठिकाणी येणे जाणे असते. मार्केटची इमारत जुनी झाल्याने स्लॅबचे तुकडे पडू लागले आहे. ग्राहकांबरोबरच मार्केटमध्ये बसणाऱया व्यापाऱयांच्या जीवाला धोका निर्माण झालेला आहे.