अर्धा तास वाहतूक खोळंबली, प्रवाशांचे फुकटात मनोरंजन
प्रतिनिधी / फोंडा
तिस्क फोंडा येथील जन्क्शनवर भर दुपारी भटक्या गुरांपैकी दोन धाकदाकट बैलाची ‘दंगल’ धिरयो रंगली. येथून ये-जा करणाऱया वाहनचालकांनी, प्रवाशांनी मोबाईलवर व्हीडीओचित्रण करून मजा लुटली. अभिमान हॉटेलसमोर सुमारे अर्धा तास कधी वाहतूकीला चकमा देत तर कधी वाहतूकीवर नियंत्रण ठेवीत दोघां बैलाची धिरयो रंगली होती. दोन्ही बैल तेवढयाच ताकदीचे असल्याने झुंज बरीच रंगात आली होती. एखाद्या धिरयोची रंगत असल्याप्रमाणे चोहोबाजूनी प्रवाशांची फुकटात करमवणूक झाली. काही वेळ वाहतूकीलाही अडथळा निर्माण झाला. बोरी-मडगांव, कवळे, फोंडा शहर प्रवाशांचे व वाहनचालकांचे फुकटात मनोरंजन झाले.
सदर घटना काल सोमवारी दुपारी 12.30 वा. सुमारास घडली. राज्यात धिरयोसाठी न्यायालयाने बंदी घातलेली आहे. ती न जुमानता आगशी, बाणावली या भागात सर्रास धिरयो रंगत असतात. फेंडय़ातील लोकांना मात्र धिरयोची मजा कधी लाभत नाही. मात्र फोंडा शहरात भटक्या गुरांचा सर्रास वावर वाढू लागल्याने हा दुर्मिळ योग फोंडेकरांना अनुभवयाला मिळाला.
फोंडय़ात नाक्यानाक्यवर भटक्या गुरांचे कळप दिसतात. भर दुपारी भटक्या गुरांची सटकली व फोडेकरांना फुकटात धिरयोची मजा लुटता आली. रस्त्यावर थिरयो सुरू असताना एका दोन वाहनांना निसटती धडकही लागली मात्र कुणीही जखमी झालेले नाही. बसमधूनही प्रवाशांची करमणूक होत होती. काहींनी सदर प्रकरण मोबाईल कॅमेरात बंदिस्त करून काल सायंकाळीपर्यंत फेंडय़ातील बहुतेक व्हॉटसऍप गुप व सोशल मिडीयावर हॅशटॅग धिरयो ट्रेन्ड करीत होते.