प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर सराफ बाजारामध्ये गेल्या तीन आठवडयामध्ये सोने व चांदीच्या दरात घसरण झाली आहे. 30 ऑगष्टला सोन्याचा दर 10 ग्रॅमला 49100 रूपये असा होता. तर 7 सप्टेंबरला 48700 रूपये असा होता. यानंतर सोन्याच्या दरात घसरण सुरू झाली आहे. तीन आठवडयात 1400 तर दहा दिवसात एक हजार रूपयांनी सोन्याचा दर उतरला आहे. शुक्रवारी 47700 रूपये असा दर होता.
सोन्याबरोबर चांदीच्या दरात घसरण झाली आहे. अवघ्या दहा दिवसात किलोमागे 2600 रूपयांनी चांदीचा दर उतरला आहे. दहा दिवसापूर्वी चांदीचा दर 66 हजार रूपये किलो होता तो, शुक्रवारी हाच दर 63400 रूपये किलो झाला आहे.