28 प्रकरणांमध्ये केला होता जप्त
प्रतिनिधी /बेळगाव
जिल्हय़ातील वेगवेगळय़ा पोलीस स्थानकात अमलीपदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत जप्त करण्यात आलेला गांजा बुधवारी नष्ट करण्यात आला. सौंदत्ती तालुक्मयातील एका कारखान्यात नियमानुसार गांजा नष्ट करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीसप्रमुख लक्ष्मण निंबरगी यांनी दिली आहे.
एकूण 28 प्रकरणांमध्ये जप्त करण्यात आलेला 335.516 किलो गांजा जिल्हा पोलीसप्रमुखांच्या उपस्थितीत नष्ट करण्यात आला. त्याची किंमत 8 लाख 48 हजार 792 रुपये इतकी होते. न्यायालयाची परवानगी घेऊन ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे.
मुरगोड पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रातील हारुगोप्प (ता. सौंदत्ती) जवळ असलेल्या दि बेळगाव ग्रीन एन्व्हीरॉन्मेंटल मॅनेजमेंट प्रा. लि. या कारखान्याच्या चिमनीत घालून गांजा नष्ट करण्यात आला. तीन महिन्यांपूर्वी जिल्हा पोलिसांनी याच कारखान्यात मोठय़ा प्रमाणात अमलीपदार्थ नष्ट केले होते.