वृत्तसंस्था / श्रीनगर
जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांनी श्रीनगरमध्ये बुधवारी संध्याकाळी झालेल्या चकमकीत 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. मृत दहशतवाद्यांमध्ये टीआरएफ या दहशतवादी संघटनेचा टॉप कमांडर सामील असल्याचे सांगण्यात येत आहे.
श्रीनगरच्या रामबाग भागात पोलिसांच्या एसओजी आणि सीआरपीएफच्या कमांडो टीमने एका गुप्त माहितीच्या आधारावर शोधमोहीम हाती घेतली होती. याचदरम्यान गर्दीयुक्त भागात त्यांची दहशतवाद्यांसोबत चकमक सुरू झाली. दहशतवादी कृत्यांसाठी कुख्यात लालचौकापासून विमानतळाच्या दिशेने जाणाऱया रामबाग उड्डाणपूलानजीक ही चकमक झाली. या चकमकीत सुरक्षा दलांनी 3 दहशतवाद्यांना यमसदनी पाठविले आहे.
चकमकीत मारले गेलेल्या तिन्ही दहशतवाद्यांची झडती घेतली असता शस्त्रास्त्रs सापडली आहेत. याचबरोबर एका दहशतवाद्याच्या कपडय़ांमध्ये त्याचे आधारकार्ड मिळाले. आधारकार्डनुसार तो बाभरा येथील मंजूर अहमद असल्याचे समजते. मंजूर 6 जूनपासून बेपत्ता झाला होता.
चकमकीनंतर सुरक्षा दलांनी परिसरात शोधमोहीम राबविली आहे. या दहशतवाद्यांसोबत असणारे आणखीन काही सदस्य गर्दीचा लाभ घेत फरार झाल्याचे मानले जातेय. तिन्ही दहशतवादी रामबाग येथेच लपले होते. दहशतवाद्यांना मदत करणाऱया लोकांचा शोध घेतला जात आहे.