वार्ताहर/ घटप्रभा
आपल्या तीन मुलांना विष पाजून ठार मारत बापाने स्वतःदेखील आत्महत्या केल्याची दुर्देवी घटना गोकाक तालुक्यातील कडबगट्टी बेट्ट येथे घडली. मारुती यल्लाप्पा पुजारी (वय 37, रा. रामकट्टी, ता. हुक्केरी) असे त्या मृत बापाचे नाव आहे, तर समर्थ (वय 8), यल्लाप्पा (वय 6) व पूजा (वय 4) असे दुर्देवी मुलांची नावे आहेत.
याबाबत गोकाक ग्रामीण पोलिसांनी मारुती याने आपल्या तिन्ही मुलांना विष पाजून त्यानंतर स्वतःदेखील विष प्राशन करून आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला. जीवनास कंटाळून त्याने हे कृत्य केल्याचा संशय व्यक्त होत असला तरी पुढील तपासानंतरच खरे कारण कळणार आहे. त्यानुसार पोलिसांनी पुढील तपास सुरू केला असून, या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.