एक्स शोरुम किमत 79,091 रुपये : अत्याधुनिक सुविधायुक्त
नवी दिल्ली
बजाज मोटार सायकलने 79,091 रुपये एक्स शोरुमची किमत असणाऱया पल्सर 125 स्प्लिट सीट मॉडेलचे सादरीकरण केले आहे. यामध्ये बीएस 6 प्रणालीवर आधारीत असणाऱया मॉडेलला 124.4 सीसी सिंगल सिलेंडर, एअर कूल्ड इंजिन असल्याची माहिती कंपनीने दिली आहे.
पाच स्पीड गिअरबॉक्सच्या इंजिनसह 11.8पीएस पॉवर आणि 10.8 एनएमचे टार्कची सुविधा आहे. या दुचाकीची टक्कर आता बाजारातील होंडा एसपी 125, हीरो ग्लॅमर आणि होंडा शाइन यांच्यासोबत राहणार असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. यामध्ये टँकवर 3 डी लोगो आणि ट्रिप मीटर सोबत डिजिटल कंसोलसह अन्य अत्याधुनिक सुविधा देण्यात आल्याचे बजाजकडून स्पष्ट करण्यात आले आहे. सदरचे मॉडेल हे तीन रंगात उपलब्ध होणार आहे.