नऊ प्रकल्पांत 50 टक्के साठा : एका दिवसात 105 मि. मी. सरासरीने पाऊस
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
सिंधुदुर्ग जिल्हय़ात सोमवारी अतिवृष्टी होऊन तब्बल 105 मि. मी. च्या सरासरीने एकूण 487 मि. मी. पाऊस पडला. त्यामुळे पहिल्याच पावसात कणकवली तालुक्मयातील हरकुळ, मालवण तालुक्मयातील धामापूर आणि सावंतवाडी तालुक्मयातील माडखोल हे तीन लघु पाटबंधारे प्रकल्प 100 टक्के भरले आहेत. तर नऊ लघु पाटबंधारे प्रकल्पांमध्ये 50 टक्क्याहून जास्त पाणीसाठा झाला आहे. दरम्यान अतिवृष्टीमध्ये अनेक घरांची पडझड झाली असून छोटय़ा-छोटय़ा पुलांवर पाणी येऊन काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.
जिल्हय़ात मंगळवारी पावसाचा जोर थोडा कमी होता. मात्र हवामान खात्याने अजून दोन दिवस अतिवृष्टी होणार असल्याचा अंदाज व्यक्त करून ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. त्यामुळे जिल्हय़ातील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
पावसाचे शतक, सरासरी 105 मि. मी. पावसाची नोंद
जिल्हय़ात गेल्या 24 तासात सरासरी 105.37 मि. मी. पावसाची नोंद झाली झाली आहे. 1 जूनपासून आतापर्यंत एकूण सरासरी 487.15 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. तालुकानिहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग – 132 (522), सावंतवाडी – 99 (596.3), वेंगुर्ले – 134 (384), कुडाळ – 129 (415), मालवण – 132 (503), कणकवली – 70 (550), देवगड – 89 (473), वैभववाडी – 58 (454).
तीन धरणे तुडुंब, नऊ धरणे पन्नास टक्के भरली
तिलारी-आंतरराज्य प्रकल्पाच्या क्षेत्रात गेल्या 24 तासात 102.20 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. सध्या या प्रकल्पामध्ये 228.1840 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा असून धरण 51.01 टक्के भरले आहे.
जिल्हय़ातील मध्यम व लघु पाटबंधारे प्रकल्पांमध्ये पुढीलप्रमाणे उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्व आकडे दशलक्ष घनमीटर परिमाणात आहेत. मध्यम पाटबंधारे प्रकल्प : देवघर – 40.3240, अरुणा – 19.5368, कोर्ले- सातंडी – 20.8380 लघु पाटबंधारे प्रकल्पातील साठा पुढीलप्रमाणे : शिवडाव – 1.7340, नाधवडे – 2.2432, ओटव – 1.2690, देंदोनवाडी – 0.6009, तरंदळे – 0.9410, आडेली – 0.4210, आंबोली – 1.1960, चोरगेवाडी – 1.0400, हातेरी – 1.1750, माडखोल – 1.6900, निळेली – 1.0380, ओरोस बुद्रुक – 0.9740, सनमटेंब – 1.2240, तळेवाडी – डिगस – 0.2680, दाभाचीवाडी – 0.8180, पावशी – 1.6390, शिरवल – 0.9940, पुळास – 1.2520, वाफोली – 0.5880, कारिवडे – 0.5160, धामापूर – 2.4410, हरकुळ – 2.3800, ओसरगाव – 0.1020, ओझरम – 1.1150, पोईप – 0.2520, शिरगाव – 0.3260, तिथवली – 0.7470, लोरे – 0.9150.