ऑनलाईन टीम / नागपूर :
कर्तव्यदक्ष आणि शिस्तप्रिय अधिकारी तुकाराम मुंढे यांनी आज नागपूर महानगरपालिकेच्या आयुक्तपदाचा पदभार स्विकारला. यापूर्वी ते एडस नियंत्रण प्रकल्पाच्या संचालकपदावर कार्यरत होते. आज आयुक्तपदाचा पदभार स्विकारताच त्यांनी आपल्या अनोख्या शैलीत कामाला सुरूवात केली.
पहिल्याच दिवशी त्यांनी पालिकेच्या अधिकाऱयांसोबत 50 मिनिटांची मिटींग घेतली. मिटींगमध्ये त्यांनी कामावर उशीरा येणाऱया कर्मचाऱयांना खडेबोल सुनावल्याची माहिती मिळते. तसेच मिटींगदरम्यान, कोणत्याही अधिकाऱयाचे फोन वाजणार नाहीत, अशा सूचनाही त्यांनी दिल्या होत्या. मिटीगनंतर ते पुढील कामाला निघून गेले.
मुंढे हे शिस्तप्रिय आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखले जातात. तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने त्यांची एडस नियंत्रण प्रकल्पाच्या संचालकपदावर नेमणूक केली होती. त्यानंतर त्यांची नागपूर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली होती. त्याचा आज त्यांनी पदभार स्विकारला.
दबावापुढे न झुकता नियमानुसार काम करणे ही तुकाराम मुंढे यांची खासियत आहे. त्यामुळे राजकारण्यांनाही त्यांची धास्ती असते.