बुधवार दि.3 ते मंगळवार दि.9 मार्च 2021
राहू-मंगळाचा शापित हलाहल योग
गेल्या 21 फेब्रुवारीपासून राहू-मंगळाचा अत्यंत विषारी हलाहल योग सुरु झालेला असून तो 13 एप्रिलपर्यंत राहील. विषारी धूर, प्रचंड आग, विजेचा लोळ म्हणजे राहू. त्याला मंगळाची साथ मिळाल्यास तो अत्यंत विषारी असा हलाहल होतो. प्रत्येकाच्या राशीनुसार अथवा लग्नकुंडलीनुसार हा योग ज्या घरात पडेल, त्या स्थानाविषयी अशुभ फळ मिळते, असे आजवरच्या अभ्यासात दिसून आले आहे. आतताईपणा, अतिवेग, हटवादीपणा, भांडण, मारामाऱया, खून, आत्महत्या, गर्भपात, विषप्रयोग, अन्नातून अथवा महाप्रसादातून विषबाधा, ठरलेल्या लग्नात अडथळे येणे, करणीबाधा, वास्तुदोष निर्माण होणे, नको ते आजार होणे, गोळीबार, दंगली, हल्ले, अश्रूधूर, अपमृत्यू, शारीरिक व्यंग निर्माण होणे, भयानक शत्रुपीडा, प्राण्यापासून दंश, मनःस्वास्थ्य बिघडणे, पोलीस केसेस, अस्थिभंग असे हजारो दोष या योगामुळे निर्माण होतात. त्याला सावधगिरी हा उत्तम उपाय समजावा. पूर्वीच्या काळात पूर्वजांच्या हातून काही नको त्या घटना घडलेल्या असतील, कुणावर अन्याय झालेला असेल, लुबाडणूक, खोटी कागदपत्रे करून इस्टेटी बळकावणे, सावकारी सदृश्य व्यवहार व त्यातून निर्माण झालेली हळहळ, तळतळाट यासह अनेक अदृश्य दोष प्रचंड वेगाने आदळतात व त्याचा संपूर्ण कुटुंबाला त्रास होऊ शकतो. साप-मुंगसाचा हा जीवघेणा खेळ प्रत्येक राशीला भोगावा लागतो. त्यातून कुणाचीही सुटका नाही. त्यासाठी या कालखंडात सर्व राशीच्या लोकांनी सर्व बाबतीत अत्यंत जपून राहणे आवश्यक आहे. साध्यासुध्या चुका देखील जीवघेणे प्रसंग निर्माण करू शकतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या हातून कळत नकळत घडलेल्या चुकांचे शापित दोष निर्माण होऊन ते प्रचंड वेगाने आदळतात. या शापित योगासाठी धर्मशास्त्रात अनेक शांती सांगितलेल्या. पण त्या सर्वानाच जमतील असे. नाही व हल्ली शांतीकर्माची खात्रीही कुणी देत नाहीत. त्यामुळे खर्चीक शांती मागे न लागता मुक्या पशुपक्ष्यांना, प्राण्यांना अन्नदान, त्यांचे रक्षण, एखाद्यावर अन्याय झालेला असेल तर तो दूर करण्याचा प्रयत्न करणे, एखाद्याचे कल्याण करणे, घटस्फोटापर्यंत गेलेली प्रकरणे मिटविण्याचा प्रयत्न करणे, यासह काही चांगले काम केल्यास या राहू-मंगळाचा कोणताही त्रास होत नाही. उलट सर्व बाजूने कल्याण होऊ शकते.
मेष
जागेचे व नोकरी संदर्भातील सर्व अडकलेले व्यवहार पूर्ण होऊ लागतील. मानसिक समाधान मिळेल. काही जुन्या गोष्टी सुधारित केल्यास पुढील ऑर्डरी मिळण्यास सुरुवात होईल. राहू-मंगळाचा गुरुशी होणारा शुभयोग सर्व बाबतीत शुभ फलदायक आहे. अशा योगावर जीवनाला शुभ कलाटणी मिळू शकते. न होणारी कामे होऊ शकतात. पण तरीही सध्या कालसर्पयोग प्रभाव चालू असल्याने सावधगिरीने राहणे योग्य ठरेल. ग्रहमान जितके चांगले असते, तितकेच ते धोकादायकही असते हे कायम लक्षात ठेवावे. त्यामुळे पुढील धोके टाळता येतात.
वृषभ
गुरु-शनिचा राहू-मंगळाशी होणारा शुभयोग अनेक महत्त्वाच्या कामात मोठे यश मिळवून देईल. दूर गावी जाऊन एखादे काम होणार असेल तर ते विशेष प्रयत्न न करता जिथे आहात तिथे होईल. त्यामुळे खर्च व वेळ वाचेल. कालसर्प योगाचा प्रभाव जोरदार आहे. त्यामुळे कोणतेही काम मन शांत ठेवून करणे आवश्यक ठरेल. कुणालाही कोणत्याही बाबतीत वचन, शब्द वगैरे देऊ नका. कोर्टमॅटर तसेच भागीदारी व्यवसाय असेल तर जपून राहा.
मिथुन
लोक कधीही कळसाकडे पाहतात पण, ज्या पायावर इमारत उभी आहे त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करतात. लोकांची ही वृत्ती लक्षात ठेवून वागावे. त्यामुळे मनःशांती बिघडणार नाही. राहु-मंगळ-गुरुचा शुभयोग वास्तुविषयक कोणत्याही कामात उत्तम यश मिळवून देईल. जुनी वास्तू वगैरे खरेदी करणार असाल तर ती बाधित नसेल, याची काळजी घ्या. ग्रहमान म्हणावे तसे अनुकूल नाही, त्यामुळे विचारपूर्वक कोणतीही गोष्ट करा. म्हणजे पुढे नुकसान होणार नाही.
कर्क
राहु-मंगळ यांचा गुरुशी होणारा त्रिकोण योग विवाह कार्य, भागीदारी व्यवसाय वास्तुविषयक कोणतीही कामे, कोर्ट प्रकरणे यात चांगले यश मिळवून देईल. मनात नसताना काही गोष्टी अचानक होऊन जातील. त्यामुळे आनंदी राहाल. मित्रमंडळीं बरोबर प्रवासात सहलीसाठी जाताना कोणत्याही धोक्मयाच्या ठिकाणी जाणे टाळा. त्यातही जुन्या वास्तू, किल्ले, दऱयाखोऱया, अपघाती जागा टाळण्याचा प्रयत्न करा. कारण ग्रहमान काहीसे धोकादायक आहे. त्यामुळे जितके सावध राहाल, तितके उत्तम ठरेल.
सिंह
काहीवेळा वाईटातूनही चांगले घडते असे अनुभव येत असतात. राहू-मंगळाचा गुरुशी होणाऱया नवपंचम योग काही व्यक्तीना फार मोठे यश मिळवून देईल. भगीरथ प्रयत्न करूनही अथवा हजारो विनवण्या करूनही जी कमी होत नव्हती ती कामे यापुढे आपोआप होऊ लागतील. त्यामुळे मानसिक समाधान लाभेल. दशम स्थान प्रबळ असल्याने नोकरी संदर्भात जो काही निर्णय घ्याल तो अत्यंत महत्त्वाचा असेल व त्याचा भावी जीवनावर दूरगामी परिणाम होईल. जीवनात काही महत्त्वाचे आमूलाग्र बदल घडू शकतात.
कन्या
काहीवेळा पापग्रह आणि शुभग्रह यांचा जर शुभयोग झाला तर अत्यंत अवघड वाटणारी कामे देखील सहज होऊन जातात. गुरु-शनि-राहू-मंगळाचा होणारा शुभयोग मुलाबाळांच्या बाबतीत महत्त्वाच्या घटना घडविल. विवाह कार्यातील अडथळे दूर होतील. एखाद्या ठिकाणी सहज म्हणून टाकलेला शब्द उचलून धरला जाईल व त्याचा फायदा तुम्हाला मिळेल. नोकरी व्यवसाय सुरु करणे, कर्जफेड, वास्तूतील दोष नाहीसे होणे, कुलदेवतेची कृपा अशा गोष्टी घडू शकतात पण, प्रत्येकाच्या कुंडलीनुसार त्याचे फळ वेगवेगळे असू शकते.
तूळ
समतोल वृत्ती हा तुमचा गुण असल्याने कितीही संकटे आली तरी त्यातून कसा मार्ग काढावा याचे तुम्हाला उपजत ज्ञान असते. त्यामुळे अवघड ग्रहमान असूनही त्याचा फारसा प्रभाव जाणवणार नाही. जागा, दुकान, वाहन, घरदार, कर्जफेड, आरोग्यात सुधारणा यादृष्टीने ग्रहमान अनुकूल आहे. पण कोणत्याही बाबतीतील अतिरेक तसेच बोलण्यावर जर नियंत्रण नसेल तर नको ती संकटेही येऊ शकतात. त्यामुळे आपण आगामी काही दिवस सर्व बाबतीत अत्यंत विचारपूर्वक राहणे आवश्यक आहे.
वृश्चिक
अचानक मोठे संकट यावे आणि देवदूतप्रमाणे कुणीतरी त्या संकटातून सहीसलामत वाचवावे असे उत्तम ग्रहमान आहे. राहू-मंगळाचा गुरु-शनिशी होणारा त्रिकोण योग अनेक बाबतीत चांगले फळ देणार आहे. जी कामे हाती घ्याल त्यात मनाप्रमाणे यश मिळेल, पण तरीही दुसरी बाजू देखील दुर्लक्षित करू नका. काही प्रमाणात धोकादायक परिस्थिती निर्माण होऊ शकेल. आर्थिक व्यवहारात जरा सावध रहा, तसेच आरोग्याची काळजी घ्या.
धनु
धन व ष÷ स्थानातील गुरु-शनिचा राहू-मंगळाशी होणारा शुभयोग आर्थिक बाबतीत काही नव्या संधी उपलब्ध करील. नोकरी-व्यवसायात सुधारणा करू शकाल. काही बाबतीत तेच ते धोरण सोडून अपडेट राहण्याचा प्रयत्न करा, त्यामुळे आगामी कालखंडात तुम्हाला नवीन कामे मिळतील व त्याचा आर्थिक फायदा होईल. आरोग्याची काळजी घ्या. बाधित ठिकाणी जाणे टाळण्याचा प्रयत्न करा. तसेच कुणी अनोळखी व्यक्तीने प्रसाद वगैरे रूपात काही खाण्यापिण्यास दिल्यास ते नम्रतेने नाकारा.
मकर
राशीतून होणारा गुरु-शनिचा राहू-मंगळाशी त्रिकोण योग. काही अनपेक्षित महत्त्वाच्या शुभघटना घडतील. मुलाबाळांचे विवाह, आरोग्य सुधारणा, धनलाभ, व्यवसायिक बदल, स्थलांतर यादृष्टीने ग्रहमान अनुकूल आहे. पण त्याचबरोबर इतर ग्रहमान बाधिक असल्याने कोणतेही व्यवहार प्रसंगावधान राखून करावे लागतील. एखादी किरकोळ चूक देखील मोठे प्रसंग निर्माण करू शकेल. त्यामुळे घाईगडबडीत कोणताही निर्णय घेऊ नका.
कुंभ
राहू-मंगळाचा गुरु-शनिशी होणारा शुभयोग वास्तुखरेदीची इच्छा पूर्ण करील. एखादे जुने वाहन खरेदी कराल. तारण वगैरे न घेता जर कुणाला पैसे वगैरे दिला असाल तर ते परत मिळू शकतात. आयुष्यातून गेलेले काहीजण अथवा पूर्वायुष्यातील काही व्यक्ती पुन्हा आयुष्यात येऊ शकतात. त्यामुळे अनपेक्षितपणे समस्या निर्माण होतील. मन शांत ठेवून पूर्ण विचारांती निर्णय घ्यावेत. कोणत्याही परिस्थितीत मानसिक गोंधळ करून घेऊ नये.
मीन
गुरु-शनिशी राहू-मंगळाचा होत असलेला त्रिकोण योग काही बाबतीत फार मोठे लाभ देण्याची शक्मयता आहे. क्षमता नसताना घरदार किंवा नोकरचाकर ठेवणे, परदेश प्रवाससंधी, मोठय़ा पगाराची नोकरी मिळणे, न जुळणारे लग्न जमणे अशा काही गोष्टी या कालखंडात घडू शकतात. त्यादृष्टीने तुमचे प्रयत्न हवेत. ग्रहमान कितीही चांगले असले तरी प्रयत्नांशिवाय काहीही साध्य होणार नाही याकडे दुर्लक्ष करू नये. प्रवास अत्यंत जपून करा. वाहन वेगावर नियंत्रण आवश्यक.