पशुपक्ष्यांमधील गूढ संवेदना व दैवीशक्ती
बुधवार दि.14 जुलै ते मंगळवार दि.20 जुलै 2021
परमेश्वराने एकपेशिय अमिबापासून हत्तीपर्यंत आणि साध्या कीटकापासून गरुडा पर्यंत असंख्य पशुपक्षी निर्माण केले आहेत. त्या प्रत्येक प्राण्याला काही दैवी शक्ती आणि संवेदना दिलेल्या आहेत. डोळसबुद्धीने अभ्यास करून त्या दैवी शक्तीचा उपयोग करून घेता येऊ शकतो. अर्थात यामागे श्रद्धा मात्र अपेक्षित आहे. आज मांजराबद्दलची काही माहिती मिळाली आहे. त्याचा थोडक्मयात सारांश येथे दिला आहे. जगभरात जे प्राणी पाळले जातात, त्यात कुत्र्या-मांजरांची संख्या अधिक आहे. प्रत्येक देवदेवता व देवींचे एक वाहन असतेच पणं मांजर हे कोणत्या देवतेच वाहन आहे? त्याचे महत्त्व काय? त्याची हत्या केल्यास प्रायश्चित का घ्यावे लागते? जेथे मांजरांचा वावर असतो तेथे लक्ष्मीचं वास असतो म्हणतात हे खरे. आहे का? कोणतेही पाळीव प्राणी आपल्या मालकावर आलेले संकट स्वतःवर ओढवून घेतात, त्यांना त्या संकटाचे ज्ञान कसे होते असे अनेक प्रश्न अनेकांच्या मनात उद्भवत असतात. या विषयावर बरेच काही लिहिता येण्यासारखे आहे. खरे ज्ञान हवे असेल तर माणसाने निरपेक्षबुद्धीने त्याचा सांगोपांग अभ्यास केला पाहिजे. समृद्धी, पैसाअडका, वंशविस्तार, मुलाबाळांचा भाग्योदय, परमेश्वरीकृपा यासह असंख्य गोष्टींचे कारकत्व असलेल्या श्रीष्टी देवीचे मांजर हे वाहन आहे व ष÷ाr देवी देखील मांजराच्या चेहऱयासारखी दिसते असे म्हणतात. एखादे मूल जन्माला आल्यानंतर त्याचे बारसे नक्षत्रयोग शांती वगैरे काहीही न करता सर्वप्रथम जी पाचवीची पूजा केली जाते, ही देवी म्हणजे ही षष्ठी देवी आहे. तिला मांजर प्रिय असल्याने तिने त्याला आपले वाहन बनविलेले आहे. त्यामुळेच मांजराची हत्या म्हणजे ‘लक्ष्मीचा कोप’ असे संबोधले जाते. प्रत्येक प्राण्याला कोणती दैवीशक्ती असते व त्याचे कोणते गुण घ्यावेत याबाबतची माहिती ‘चाणक्मयनिती’ मध्ये मिळू शकते. तुमची रास कोणतीही असो, पण कोणत्या स्थानात मांजरयोनी पडलेली आहे, त्या स्थानाने दर्शविलेल्या कारकत्वावर त्याचा बरा वाईट प्रभाव दिसून येतो. एखाद्याच्या पत्रिकेत धन अथवा दशम किंवा लाभस्थानात मांजरयोनी पडलेली असेल व तेथे गुरु किंवा शुक्र असतील तर त्या व्यक्तीला आयुष्यात कधीही कमी पडत नाही. कुबेराचे ऐश्वर्य त्याला लाभते. थोडय़ाशा सरावाने तुमच्या पत्रिकेत ही मांजरयोनी कुठे पडलेली असेल हे सहज ओळखता येते. मांजर पाळणे कुणाला शुभ व कुणाला अशुभ असा प्रश्न विचारतात, पण मांजर कोणीही पाळू शकतात. मांजराची वार ही लक्ष्मीदायक मानली जाते, पण ती अत्यंत दुर्मीळ असल्याने सहसा मिळत नाही.
मेष
या आठवडय़ात अत्यंत महत्त्वाचे असे रवि-शुक्र-मंगळ ग्रह बदलेले आहेत. पंचमातील मंगळ-शुक्रामुळे कलाकौशल्य, मंत्र-तंत्र, देविकृपा या दृष्टीने चांगले अनुभव येतील. पण हा योग आणि तो प्रवृत्ती निर्माण करतो. त्यासाठी तरुण-तरुणींनी प्रेम प्रकरणापासून सावध राहावे. कारण या योगावर मुली फार लवकर प्रेमात पडतात व पुढे फसण्याची शक्मयता असते. ववि-शनि योगावर किरकोळ संघर्ष होईल पण कोणतेही काम अर्धे राहणार नाही. बुधाचे भ्रमण सर्व दृष्टीने शुभ असल्याने कोणत्याही अडचणी आल्या तरी त्यातून निश्चितच योग्य मार्ग मिळेल व संकटे आपोआप दूर होतील. आरोग्य सुधारेल. मनात ज्या काही गोष्टी आहेत त्या पूर्णत्वास जाऊ लागतील.
वृषभ
रवि तृतीयात व मंगळ शुक्र चतुर्थात अशी महत्त्वाची ग्रहस्थिती आहे. कितीही अवघड व मोठे काम असले तरी ते निश्चित पूर्ण करू शकाल. कौटुंबिक जीवनात आनंदी वातावरण राहील. ओळखीतील व्यक्ती अथवा नातेवाईकांशी विवाहसंबंध जुळण्याची शक्मयता आहे. कलागुणांना व कर्तृत्वाला प्रोत्साहन देणारे चांगले योग दिसतात. त्याचा योग्य वापर केल्यास जीवनाचे सोने करू शकाल. रवि-शनिचा प्रतियोग तसेच शनि-मंगळ षडाष्टक योग अपघातदर्शक आहे. कुठेही बेफिकीर राहू नका.
मिथुन
राशीस्वामी बुध बलवान असल्याने सर्व बाबतीत यशस्वी ठराल. कोणतेही काम अवघड वाटणार नाही. कोणतेही मोठे व धाडसाचे काम करण्यास हरकत नाही. निश्चित यश मिळेल. रवि-शनि प्रतियोग, अपघात व अनारोग्यदर्शक आहे. मंगळ -शुक्र सहयोग तुमच्या अंगच्या कलागुणांना तसेच साहित्य, संगीत, गायन, वादन याला प्रोत्साहन देईल. काही जणांना जागतिक कीर्ती देखील मिळू शकते, पण या योगावर आपले आचरण बिघडणार नाही याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. व्यसनी व्यक्तीपासून दूर राहणे चांगले. वाहन चालवताना बेदरकार राहू नका.
कर्क
राहुकृपेमुळे आर्थिक अडचण पडणार नाही. शनि-रविच्या प्रतियोग कोणतेही विचार स्थिर ठेवू देणार नाहीत. मनात सतत काही ना काही धाकधक होत राहील. धनस्थानातील शुक्र-मंगळामुळे हौस अथवा चैनीखातर बराच खर्च कराल. त्यावर वेळीच नियंत्रण ठेवावे अन्यथा पुढे गंभीर प्रश्न उद्भवतील. शनि-मंगळ षडाष्टक योग चांगला नाही. त्यामुळे बोलण्यावर नियंत्रण ठेवा. वाहनवेग आटोक्यात ठेवणे योग्य. कुणाच्याही कोणत्याही प्रकरणात पडणार नाही याची काळजी घ्या. व्यवसायिक बाबतीत कोणत्याही अडचणी नाहीत.
सिंह
तुमच्या राशीतच शुक्र-मंगळ धनदायक योग करीत आहे. कामाचा उरक वाढेल. आर्थिक व्यवहार वाढतील. मानसिक समाधान देणारा महिना आहे. जे काम हाती घ्याल ते पूर्ण होईल. राहू, सर्वदृष्टीने मोठे यश देणार आहे. रवि-शनि प्रतियोग काही बाबतीत त्रासदायक आहे. कोणते काम सहजगत्या पार पडणार नाही. कामाचा ताण वाढेल. वडिलधाऱयांशी काही बाबतीत वैचारिक मतभेद होतील. सांभाळून घ्या. चंद्र-गुरुचा शुभयोग अनेक बाबतीत तुमचे कर्तृत्व जगाच्या समोर आणण्याचा प्रयत्न करेल. पण त्या प्रमाणात संघर्षही वाढेल.
कन्या
राशीस्वामी मंगळ बलवान आहे. त्यामुळे सर्वजण तुमचा आदर करु लागतील. कोणतेही काम अवघड वाटणार नाही. जो काही निर्णय घ्याल तो अचूक असेल. मानसिक समाधान लाभेल. शुक्र-मंगळाचे भ्रमण नको त्या ठिकाणी सुरू आहे. अशा योगांवर काही वेळा प्रेमप्रकरणे उद्भवतात किंवा कोणीतरी गुंतवण्याचा प्रयत्न करतात. खर्चाचे नवे प्रसंगही येतात. त्यासाठी आपण सावध राहावे, पण या योगावर मानसिक उत्साह वाढेल. नोकरीत बढती अथवा बदलीसाठी प्रयत्न करण्यास हरकत नाही. रवि-शनि प्रतियोग, संतती व मित्रमंडळी यांच्या बाबतीत काही अडचणी निर्माण करेल. मुलाखत अथवा भरतीसाठी प्रयत्न करत असाल तर ते काम होऊ शकेल.
तूळ
शुक्र-मंगळाचे लाभस्थानी होणारे भ्रमण सर्व बाबतीत लाभदायक आहे. विवाहातील अडचणी कमी होतील. काही कारणाने रखडलेला विवाह मूर्तस्वरूप घेईल. नोकरी-धंदा, व्यवसायात प्रगती होऊ लागेल. आर्थिक अडचणी आपोआप कमी होतील. कर्जफेडीसाठी प्रयत्न करा. रवि-शनिचा प्रतियोग नोकरी-व्यवसायात महत्त्वाची जबाबदारी टाकण्याची शक्मयता दिसते. वडिलधारी मंडळी तसेच मालकाशी मतभेद होण्याची दाट शक्मयता. चंद्र-गुरुचा शुभयोग संततीप्राप्ती भाग्योदय आर्थिक सुधारणा, मानसिक समाधान देईल.
वृश्चिक
दशमस्थानी शुक्र-मंगळ हा एक प्रकारचा राजयोग आहे. अपेक्षित ठिकाणी काम करण्याची संधी मिळेल. आवडत्या व्यक्तीशी विवाह ठरण्याची शक्मयता. एखादे प्रेमप्रकरण असेल तर ते यशस्वी होऊ शकेल. भविष्य काळासाठी केलेले प्रयत्न यशस्वी ठरतील. रवि-शनिचा प्रतियोग सुरू आहे. प्रवासात काळजी घ्या. किमती वस्तू सांभाळा. राजकारणात असाल तर बेताल वक्तव्यापासून दूर राहणे आवश्यक. भाषण देण्याच्या भरात काहीतरी बोलल्यामुळे त्याचा विपर्यास केला जाईल.
धनु
भाग्यस्थानी शुक्र-मंगळ योग म्हणजे आनंद, प्रवास व सर्व सुखसोई मिळणार असल्याची लक्षणे म्हणावीत. मन उत्साही राहील. नवनवीन जबाबदारी घेण्याकडे कल राहील. स्वभावात जरा हटवादीपणा वाढण्याची शक्मयता आहे, पण जिद्दीने कोणतेही काम पूर्ण कराल. व्यापार, उद्योग, व्यवसाय, नोकरी यादृष्टीने ग्रहमान अनुकूल आहे. पण रवि-शनिचा प्रतियोग अचानक आर्थिक अडचणी किंवा मोठे खर्च निर्माण करू शकतो. तसेच जागेच्या व्यवहारातून वादावादी, मतभेद होऊ शकतात. मालकांनी सोपवलेले काम नाकारल्याने काहीजणांना नोकरीही गमवावी लागेल. त्यासाठी कामाकडे दुर्लक्ष करू नका.
मकर
आर्थिक व्यवहार जोरात चालतील. अडकलेली थकबाकी वसूल होईल. पूर्वी जर कोठे गुंतवणुक केलेली असाल तर त्याचा परतावा मिळण्याची शक्मयता. घर, जागा, वाहन किंवा दुकान घेण्याचा विचार करावा. पण राशीच्या अष्टमात शुक्र-मंगळ म्हणजे रक्तदोष व किरकोळ अपघात आणि खर्च वाढणार यांचे निदर्शक आहे. आगामी काही दिवसात प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. रवि-शनिचे प्रयोग चालू असल्याने कोर्टप्रकरणे शक्मयतो करू नयेत. किरकोळ चुका देखील उग्रस्वरूप धारण करू शकतात. कोणत्याही कागदपत्रावर न वाचता चुकूनही सही करू नका.
कुंभ
चंद्र-गुरूचा गजकेसरी योग सुरु असल्याने मोठय़ा कामात यश मिळणार आहे. आर्थिकलाभ होतील. मानसिक समाधान मिळेल. कितीही अडचणी आल्या तरी त्यातून सहीसलामत बाहेर पडाल. सप्तमातील शुक्र-मंगळ युतीमुळे वैवाहिक सौख्य चांगले राहील. पती-पत्नीतील प्रेम वाढेल. काही कारणाने नको त्या थरापर्यंत गेलेली प्रकरणे आपोआप थंड पडतील. साडेसातीचा प्रभाव फारसा जाणवणार नाही. त्यामुळे उत्साहाने कामाला लागा. नोकरचाकर ठेवणार असाल तर कागदपत्रांसह पूर्ण माहिती तपासून ठेवा..
मीन
शुक्र-मंगळाशी राशीचा प्रितीषडाष्टक योग होत आहे. अशा योगावर बिघडलेले संबंध सुधारतात. विवाहकार्यात यश मिळू शकते. प्रेमप्रकरणे निर्माण होतात. खर्च वाढू शकतात. काहीवेळा अतिसलगीमुळे गैरसमज देखील होतात. रवि-शनिचा प्र तियोग सुरू आहे. मुलाबाळांची काळजी घ्या. कोणत्याही वाहनात बसताना घाई गडबड करू नका. किरकोळ चुकांमुळे दुर्घटना घडू शकते. राशीस्वामी गुरु आध्यात्मिक क्षेत्रात चांगले यश मिळवून देईल. घरात पूर्वापार आध्यात्मिक उपासना चालू असेल तर काही भाग्यवंतांना दृष्टांत देखील होऊ शकतील.