बुधवार दि.30 सप्टेंबर ते मंगळवार दि.6ऑक्टोबर 2020
राहू-केतूचे स्थानपालट झाल्यानंतर कोरोनाचे प्रमाण काही दिवस कमी राहील पण, नोव्हेंबर-डिसेंबर-जानेवारी-फेब्रुवारी हे चार महिने अनिष्ट ग्रह योगात असल्याने पुन्हा या रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्मयता आहे. आतापर्यंत बरे झालेल्या अनेक रुग्णांना पुन्हा कोरोनाची लागण झाल्याच्या बातम्या येत आहेत. दुप्पट वेगाने वाढणाऱया या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लोकांनी हयगय करू नये, कारण यापुढील या रोगाचा हल्ला जीवघेणा असेल. 16 नोव्हेंबरपासून त्याचा प्रभाव वाढू लागेल. त्यातही 16 जानेवारी ते 12 फेब्रुवारी हा कालखंड जरा चिंताजनक आहे. कोरोनावरील वैद्यकीय उपचारांचा खर्च सर्वसामान्य लोकांना परवडणारा नाही. कोरोनाच्या पदराखाली अनेकांनी आपले उखळ पांढरे करून घेतलेले आहे. कोरोना झाल्याचे लेखी सर्टिफिकेट मात्र कुणीही देत नाहीत. लोकांनी घरदार विकून तळतळून दिलेला पैसा कधीही लाभत नाही. परमेश्वराच्या दरबारात कधी ना कधी त्याचा हिशोब द्यावाच लागतो व निसर्ग व्याजासहित ते पैसे वसूल करतो. यासाठी तो कोणत्या मार्गाचा अवलंब करील हे सांगता येणार नाही. उपचारांबरोबरच जर लोकांनी धार्मिकतेकडे लक्ष दिल्यास बरेच काही साध्य होऊ शकते. श्री गणेश अपामार्जन स्तोत्र अथवा दुर्गा सप्तशतीमधील काही विशिष्ट मंत्र तसेच महामृत्युंजय मंत्राचा जप अथवा अनु÷ान चालू ठेवल्यास या रोगावर नियंत्रण ठेवता येईल. डॉक्टर कितीही हुशार असले तरी शेवटी परमेश्वरावर विश्वास ठेवा असे म्हणतात. रामरक्षा स्तोत्र देखील एक अमोघ कवच आहे. तसेच ‘शुभंकरोती कल्याणम’ हा मंत्र देखील आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाचा मानलेला आहे. लोकांना कोरोनाचे भय राहिलेले नाही. त्यामुळे ते बिनधास्त जत्रा असल्याप्रमाणे व मास्क न वापरता फिरतात. स्वतःबरोबरच इतरांचाही जीव धोक्मयात घालतात. त्यामुळे लोकांनी यापुढे तरी शहाणे व्हावे. फायदा-तोटा वगैरे काही न पाहता या वषी जर जिवंत राहिलात तर पुढील वर्षात कुटुंबाचे रक्षण करू शकाल. आजकालची परिस्थिती पाहता आजचा माणूस उद्या दिसेल की नाही, याची शाश्वती नाही. लोक कायदा पाळत नसल्यामुळे सरकारनेदेखील कोरोना प्रकरणातून अंग काढून घेण्यास सुरुवात केलेली आहे. शेवटी आपले रक्षण आपल्यालाच करावे लागेल. आगामी कालखंड अति भयानक आहे. ज्योतिषशास्त्राचा हा इशारा समजून प्रत्येकाने सावधगिरीने वागावे.
मेष –
या आठवडय़ात बुध सप्तमात असून मंगळ बाराव्या स्थानी येणार आहे. भागीदार चांगले मिळतील. विवाहाच्या प्रयत्नात असाल तर जोडीदार उत्तम मिळेल. सर्व कामात यश. चित्रकला व इतर क्षेत्रात नावलौकिक. प्रत्येक गोष्टीच्या मुळाशी जाऊन चिकित्सा कराल. आर्थिक अडचणी येणार नाहीत पण, पैसा टिकेल असे नाही.
वृषभ –
बुधाचे वास्तव्य ष÷स्थानी आहे. आर्थिक बाबतीत चांगली फळे मिळतील. लिखाणाशी संबंध असलेल्याना मोठा फायदा होईल. बंडखोर आणि वितंडवाद करणाऱयांपासून दूर रहा. अति जीवलावून घेतल्यामुळे एखाद्या प्रकरणात नको ते गंभीर प्रसंग उद्भवतील.
मिथुन –
पंचमात आलेल्या बुधामुळे संततीसौख्य उत्तम राहील. गायन-वादन, लिखाण या क्षेत्रात प्रगती होईल. गूढविद्या तसेच इंजिनियरिंगशी संबंध असेल तर फार मोठे यश. सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करा. आळशीपणामुळे तुमच्या हातून मोठय़ा संधी जातील. मंगळाचे भ्रमण नोकरी-व्यवसायात चांगली प्रगती करेल.
कर्क –
सुखस्थानी आलेल्या बुधामुळे वाहनसौख्य उत्तम राहील. खूप संपत्ती मिळण्याचे योग. संगीतकला शिकण्याची आवड निर्माण होईल. संकटकाळात मदत करणारे मित्र भेटतील. मात्र नातेवाईक दुरावतील. एखादे नवीन काम मिळण्याची शक्मयता आहे. मंगळामुळे प्रवासात आर्थिक नुकसान.
सिंह –
बुधाचे पराक्रमातील वास्तव्य कौटुंबिक सौख्य वाढविल. साहसी व चपळ असाल तर अनेक कामे पटापट कराल. कामासाठी भरपूर प्रवास घडतील. मंगळाचे भ्रमण धोकादायक आहे. नको ते धाडस करू नका. समुद्र, नद्या, सरोवरे या ठिकाणी धोका होईल.
कन्या –
धनस्थानी बुध सर्व बाबतीत शुभ, फलदायी आहे. वाणीच्या सहाय्याने धन कमवाल. आकाशवाणी, रेडिओ, टीव्हीवर निवेदक किंवा जाहिरातीसाठी आवाज, देणे, व्याख्याने, दलाली, प्रकाशन यातून बऱयापैकी पैसा मिळेल. शिक्षणात चांगली प्रगती दिसून येईल. सप्तमात होणारे मंगळाचे आगमन पती-पत्नी संबंधात वैमनस्य निर्माण करील.
तूळ –
मोहक व आकर्षक बोलण्यामुळे इतरांवर छाप पडेल. त्यामुळे काही जणांना नव्या क्षेत्रात प्रवेश करण्याची संधी मिळेल. या महिन्यात सतत उद्योग करीत रहाल. पूर्वी चुकलेले काही गणितीय हिशोब बरोबर जुळतील. मंगळाचे भ्रमण आर्थिक दृष्टय़ा फायदेशीर आहे.
वृश्चिक –
बुधाचे भ्रमण म्हणावे तितके चांगले नाही. काहीजण निष्कारण बदनामी करण्याचा प्रयत्न करतील. मित्रमंडळींकडून विश्वासघात होण्याची शक्मयता पण, आर्थिक स्थिती चांगली राहील. सर्वप्रकारचे वैभव आपोआप येईल. पंचमातील मंगळामुळे शिक्षणात अडथळे येऊ शकतात. तसेच पती-पत्नीत वादावादी होऊ शकते.
धनु –
लाभस्थ बुधामुळे मानसिक उन्नती होईल. शासकीय कामकाजात मोठे यश मिळेल. एकाग्रतेने अभ्यास करणे जमू शकेल. चांगले गुरु मिळतील. तुमच्या हातून परोपकाराची कामे झाल्यामुळे लोकांचा तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. त्याचा पुढे तुमच्या प्रगतीसाठी फायदा होईल.
मकर –
या महिन्यात अनेक व्यवसाय हाती घेऊन ते यशस्वी करून दाखवाल. राजकारणाची आवड असेल तर त्यात जाण्यास हरकत नाही. सांसर्गिक रोगापासून जपावे लागेल. सोने-चांदी, घडय़ाळ वगैरे हरवले असेल तर ते परत मिळू शकेल.
कुंभ –
सर्व क्षेत्रात भाग्याची उत्तम साथ मिळेल. कौटुंबिक जीवन सुखी व समाधानी राहील. शंतती-संपत्ती, खरेदी-विक्री, प्रवास, मंगलकार्य या दृष्टीने ग्रहमान अनुकूल आहे. या महिन्यात कोणतेही अवघड कार्य पूर्ण करू शकाल.
मीन –
चंद्र-मंगळाचा लक्ष्मीयोग नोकरी-व्यवसायात उत्तम प्रगती करून देईल. अष्टमातील बुधामुळे अचानक धनलाभाच्या संधी येतील. उत्कृष्ट अधिकार योग. या महिन्यात नवीन भागीदारी व्यवसाय चुकूनही करू नका. पुढे काहीतरी निश्चित गोंधळ होईल.
आनंद मत्तिकोप , फोन: 9449410911