मुंबई \ ऑनलाईन टीम
काँग्रेस नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांची आज (बुधवार,२६मे) ७६ वी जयंती आहे. वडिलांच्या वाढदिवसानिमित्त अभिनेता रितेश देशमुख व सून जेनेलियाने जुन्या आठवणींना उजाळा देत एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. तुमच्या आठवणीशिवाय एकही दिवस जात नाही असे रितेशने म्हटले आहे.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या जयंतीच्यानिमित्ताने रितेश देशमुखने त्यांच्यासोबतचा बालपणीचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये रितेश देशमुख आपल्या वडिलांशेजारी म्हणजे विलासराव देशमुख यांच्या बसला आहे. रितेशने पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि पॅन्ट असा पेहराव केला आहे. हा फोटो शेअर करत रितेश देशमुख याने लिहिले आहे की, तुमची आठवण आल्याशिवास एकही दिवस जात नाही. परंतु आठवण आल्यावर एक वेदना जाणवते ती कधीही जात नाही,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा! तुमची नेहमी आठवण येते, अशी भावनिक पोस्ट रितेशने इन्स्टावर शेअर केली आहे.
तर जेनेलियाने सासरे विलासराव देशमुख यांना मिठी मारतानाचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो रितेश आणि जेनेलियाच्या लग्नातील आहे. हा फोटो शेअर करत तिने ‘वाढदिवसाच्या शुभेच्छा बाबा.. आम्हाला रोज तुमची आठवण येते.. बापलेकीची ही मिठी चिरंतन राहील’ या आशयाचे कॅप्शन दिले आहे.
गेल्या वर्षी रितेशने वडिलांच्या ७५व्या जयंतीनिमित्त भावनिक व्हिडओ शेअर केला होता तर आता बालपणीचा फोटो शेअर करत ती वेळ पुन्हा यावी… अशी भावनाही रितेशने आपल्या पोस्टमध्ये व्यक्त केली आहे.