ऑनलाईन टीम / मुंबई
बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण गेल्या काही दिवसांपूर्वी ‘छपाक’ चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत होती. मात्र चित्रपटापेक्षाही जास्त जेएनयूमधील आंदोलनात हजेरी लावल्याने तिची जास्तच चर्चा झाली .चित्रपट प्रदर्शित होण्याआधी जेएनयूमध्ये गेल्यामुळे तिच्यावर काहीजणांनी टीका करत चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी सुरु केली. जेएनयूमधील विद्यार्थ्यांना पाठिंबा दिल्याचा परिणाम तिच्या चित्रपटासोबत इंटरनेट मूव्ही डेटाबेसच्या (आयएमडीबी) रेटिंगवरही पहायला मिळाला. आयएमडीबी छपाक चित्रपटाला मोठ्या प्रमाणात डाऊनवोट करण्यात आलं.
दरम्यान दीपिकाचा एक व्हिडीओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत दीपिका तिच्यावर टीका करणाऱ्यांना तसंच द्वेष करणाऱ्यांना उत्तर देताना दिसत आहे. “त्यांनी माझं रेटिंग बदललं, मन नाही,” असं दीपिकान म्हटलंय.