प्रतिनिधी /पेडणे
नाना पाटेकर, श्रीया शिरन, अली फैजल व तापसी पन्नू असे दिगज्ज कलाकार असलेल्या ‘तडका’ या हिंदी सिनेमात श्री भगवती विद्यालयाचा विद्यार्थी तुये- पेडणे येथील बालकलाकार कु. तन्मय खर्बे याला बालकलाकाराची भूमिका साकारण्याची संधी मिळाली आहे. ‘तडका’ सिनेमाची सुरुवातचा तन्मयच्या पात्राने होते. सदर चित्रपट हा नामांकित झी 5 या ऍप वर दि. 4 नोव्हेबर रोजी प्रदर्शित झाला असुन त्यात तो आपण पाहू शकता.
या अगोदर तन्मयने ‘इश्क तेरा’ या हिंदी व ‘आमोरी’ कोकणी चित्रपटात काम केले होते. तन्मयने झी मराठीवर ‘राञीस खेळ चाले 2’ या मालिकेतही छोटय़ा माधवाची भूमिका उत्तमपैकी साकारली होती. तन्मय सिनेमा, मालिका तसेच नाटकातही काम करतो. त्याने आतापर्यंत 10 नाटय़प्रयोग पणजी, फोंडा व काणकोणपर्यंत श्री ओंकार थिएर्टस, पेडणे, या संस्थेच्या मार्फत व इतर ठिकाणी केले आहेत.
कु, तन्मयला अनेक बक्षीसे व पुस्स्कार लाभतच आहेत व भारत सरकारने या सर्वांची दखल घेत तन्मयला नाटय़कला शिकण्यासाठी वयाच्या 20 वर्षांपर्यंत कलाशिष्यवृती मे महिन्यात 2022 मध्ये जाहीर केली होती. तन्मयला ‘तडका’ सिनेमासाठी सोशल मिडीयावर भरभरून शुभेच्छा लोकाकडून मिळत आहेत.