ऑनलाईन टीम / जकार्ता :
इंडोनेशियाच्या बँटन प्रांतात एका तुरुंगाला मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास आग लागली. क्षणार्धातच आगीने उग्ररुप धारण केले. यात 40 कैद्यांचा दुर्देवी मृत्यू झाला असून, 8 कैदी गंभीर जखमी आहेत. तर 73 जण किरकोळ जखमी आहेत.
कायदे आणि मानवाधिकार खात्याचे प्रवक्ते रिका अप्रिअंटी यांनी म्हटले आहे की,
बँटन प्रांतातील एका तुरुंगात तांजेरंग प्रिसन्स ब्लॉक-सी मध्ये मध्यरात्री दीडच्या सुमारास भीषण आग लागली. तुरूंग प्रशासनाकडून कैद्यांना सुरक्षित स्थळी हलविण्यात येईपर्यंत आगीने उग्र रुप धारण केले. यात 40 कैद्यांचा दुर्देवी मृत्यू झाला असून, 8 कैदी गंभीर जखमी आहेत. तर 73 जण किरकोळ जखमी आहेत. या आगीचे नेमके कारण अद्याप समोर आले नाही. दरम्यान, आग लागलेल्या तुरुंगाची क्षमता 600 कैद्यांची आहे. मात्र, यात 2000 हून अधिक कैदी ठेवण्यात आले होते. ज्या ब्लॉकमध्ये आग लागली होती, त्या ब्लॉकमध्ये अंमली पदार्थ तस्करांना ठेवण्यात आले होते.